लवकरच ऑगस्ट महिना चालू होणार आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात देशात काही नियमांत बदल होतो.
बदललेल्या या नियमांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर पडतो. याच पार्श्वभूमीवर यावेळी 1 ऑगस्टपासून कोणकोणते नियम बदलणार हे जाणून घेऊ या..
प्रत्येक महिन्याला एलपीजी गॅस सिलिंडरचे दर बदलतात. गेल्या महिन्यात 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात बदल झालेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून 14 किलोंच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात बदल झालेला नाही. त्यामुळे 1 ऑगस्टपासून गॅस सिलिंडरच्या दरात काय बदल होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
1 ऑगस्टपासून HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल होणार आहे. तुम्ही CRED, Paytm, Mobikwik, Freecharge तसेच अन्य अॅप्सच्या माध्यमातून दिल्यास तुम्हाला प्रत्येक ट्रान्झिशनवर 1 टक्के चार्ज लागेल. तुम्ही इंधन खरेदी करताना 15000 रुपयांपेक्षा पैसे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देत असाल तर 1 टक्के चार्ज लागेल. त्यापेक्षा कमी किमतीच्या ट्रान्झिशनवर चार्जेस लागणार नाही.
प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला इंधन, ऑइल कंपन्या हवाई ईंधन म्हणजेच एअर टर्बाईन फ्यूअल (ATF) आणि CNG-PNG च्या दरात बदल करतात. 1 तारखेला यांचे नवे दर समोर येतील.
गुगल मॅपने आपल्या काही नियमांत बदल केला आहे. हे नियम येत्या 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत.
आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्यानंतर आयटीआर भरायचा असेल तर तुम्हाला विलंब शुल्क द्यावे लागेल. त्यानंतर 1 ऑगस्टपासून तुम्हाला आर्थिक वर्ष 2023-24 साठी जुन्या कर प्रणालीची निवड करता येणार नाही.