बॉलिवूडचा किंग खान शाहरुखला मोतीबिंदू? उपचारासाठी तातडीने अमेरिकेला रवाना

0
120

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखला (Shahrukh Khan) तातडीने अमेरिकेला रवाना होणार आहे. मुंबईत उपचारादरम्यान काही समस्याच उद्भवल्याने शाहरुख आता उपचारासाठी अमेरिका गाठणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख हा मंगळवारीच अमेरिकेला रवाना होणार आहे. शाहरुखच्या प्रकृतीबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शाहरुख खानला मोतीबिंदू झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एका वृत्तानुसार, शाहरुख खानला मोतीबिंदूचा त्रास सुरू असून मागील महिनाभरापासून त्याच्यावर उपचार सुरू आहे. शाहरुख खानच्या डोळ्यावर 29 जुलै रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. त्यामुळे आता पुढील शस्त्रक्रियेसाठी शाहरुख खान अमेरिकेला जाणार आहे. शाहरुख खानवर अमेरिकेत डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो स्वित्झर्लंडला जाणार असल्याचे वृत्त आहे. आयपीएलदरम्यान शाहरुखला उष्माघाताचा त्रास झाला होता. त्यानंतर त्याला काही काळ रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर त्याला मोतीबिंदू असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबईत शाहरुखवर शस्त्रक्रिया….
अभिनेता शाहरुख खानवर काही काळ उपचार सुरू होते. शाहरुख खानच्या दोन्ही डोळ्यांना त्रास होत होता. शाहरुख खानच्या एका डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे. आता पुढील शस्त्रक्रिया अमेरिकेत होणार असल्याचे वृत्त आहे. मुंबईतील रुग्णालयात शाहरुखवर डॉक्टरांनी ठरवल्याप्रमाणे उपचार झाले नाहीत. त्यामुळे आता अमेरिकेत पुढील उपचार सुरू झाले.

 

शाहरुख खानचे आगामी प्रोजेक्ट..
शाहरुख खानने मे महिन्यात सांगितले होते की, 2024 मध्ये आपण चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असणार आहे. शाहरुख खान लवकरच लाडकी लेक सुहाना सोबत ‘किंग’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सुहाना शाहरुखसोबत ॲक्शन करताना दिसणार आहे.

डंकी हा शाहरुखचा रिलीज झालेला मागील चित्रपट होता. हा चित्रपट मागील वर्षी नाताळाच्या दिवशी रिलीज झाला होता. या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सरासरी कमाई केली.