
माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी/प्रतिनिधी : करगणी (ता. आटपाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ च्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा गुरुवारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी जगनाथ कोळपे, केंद्र प्रमुख श्री. खरात, करगणीचे लोकनियुक्त सरपंच सौ. सुरेखा तात्यासाहेब व्हनमाने, उपसरपंच साहेबराव खिलारी, माजी सरपंच तुकाराम जानकर, भाजप सरचिटणीस बाळासाहेब सरगर, चेअरमन अंबादास सरगर, ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब सरगर, नाथा सरगर, अभिजीत जाधव, मुद्दसर इनामदार, बाळासाहेब कांबळे, रावसाहेब सरगर, सौ. रुपाली कांबळे, माळी मॅडम, निलेश कांबळे, पिटु कांबळे, भारत पाटील नाना, प्रकाश सरगर, विठ्ठल ढोबळे, विलास गेंड, दिलीप सरगर, कोंडीबा सरगर, दादासाहेब मंडले, अशोक खिलारी हवालदार, सुनील पुकळे, प्रदीप जवळे, मुरली सरगर, आप्पा शिंदे, वैभव गेंड, उमेश योगे, विक्रम गेंड, दत्तात्रय खिलारी, चिकु पांढरे यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक खंदारे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय जानकर, सर्व शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, तसेच ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली.
नवीन इमारतीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना अधिक सोयीस्कर व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार असून, गावाच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.