करगणीत ‘आण्णा आप्पाच्या कुरघोड्या’ वेब सिरीजच्या कलाकारांचा सत्कार

0
0

माणदेश एक्सप्रेस न्युज / आटपाडी / प्रतिनिधी : करगणी (ता. आटपाडी) येथील लोकप्रिय ‘आण्णा आप्पाच्या कुरघोड्या’ या वेब सिरीजच्या सर्व कलाकार व निर्मिती टीमचा करगणी येथे भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास करगणी जिल्हा परिषद गटाचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार विनायकराव मासाळ साहेब व करगणी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय पाटील उपस्थित होते.

ग्रामीण भागातील जीवन, मातीतील कलाकार आणि स्थानिक संस्कृती प्रभावीपणे मांडणाऱ्या या वेब सिरीजमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचत असून, अशा कलाकृतींना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

या सत्कार समारंभातून कलाकारांचा सन्मान तर झालाच, पण ग्रामीण भागातील कला, संस्कृती आणि नवोदित कलाकारांना नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त झाली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते व कला रसिक उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here