करणवीर मेहराने ‘बिग बॉस18’ च्या ट्रॉफीवर कोरलं नाव…

0
76

‘बिग बॉस १८’ चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. करणवीर मेहराने ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना यांच्यात चुरस होती. विशेष म्हणजे प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा १० मिनिटांसाठी वोटिंग लाईन्स ओपन ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रेक्षकांनी करणवीर मेहराला जास्त वोट देत विजेता केलं. बिग बॉसचा विजेता होताच करणवीरने एक रेकॉर्ड त्याच्या नावावर केला आहे.

 

‘बिग बॉस १८’ची ट्रॉफी जिंकण्याआधी करणवीर मेहरा ‘खतरों के खिलाडी १४’चा विजेता ठरला होता. त्यानंतर त्याने ‘बिग बॉस १८’च्या ट्रॉफीवरही नाव कोरलं. ‘बिग बॉस’ आणि खतरों के खिलाडी अशा दोन रिएलिटी शोचे विजेतेपद मिळवणारा करणवीर मेहरा दुसरा अभिनेता आहे. याआधी सिद्धार्थ शुक्लाने देखील ‘बिग बॉस’ आणि खतरों के खिलाडी या शोचे विजेतेपद मिळवले होते.

 

करणवीर मेहरा हा सुरुवातीपासूनच बिग बॉसमध्ये एक स्ट्राँग स्पर्धक राहिला. त्याची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ होती. याचाच रिझल्ट म्हणजे प्रेक्षकांनी त्याला भरभरुन वोट दिले. करणवीरला आकर्षक ट्रॉफीसह सुमारे बक्षीस रक्कम म्हणून ५० लाख रुपयांचा चेक मिळाला आहे.