करगणीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आटपाडी शहर बंदचे आवाहन

0
1

आटपाडी | माणदेश एक्सप्रेस न्यूज

करगणी (ता. आटपाडी) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात संबंधित अल्पवयीन मुलीला काही विघ्नसंतुष्टांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपही होत असून, नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि रोष निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आटपाडी तालुक्याच्या वतीने येत्या शुक्रवार दिनांक २५ जुलै २०२५ रोजी आटपाडी शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदचा उद्देश संबंधित घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्याचा असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भाजपचे तालुकाध्यक्ष दादासाहेब आनंदा हुबाले यांनी एका पत्राद्वारे नागरिकांना, व्यापाऱ्यांना व सामाजिक संस्थांना शांततेत बंदला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “ही घटना केवळ एका कुटुंबावरचा आघात नसून, संपूर्ण समाजाच्या अस्मितेवरचा हल्ला आहे.

त्यामुळे सर्वांनी एकजुटीने या अन्यायाविरोधात उभे राहिले पाहिजे.” असे आवाहन केले आहे. सदरचे निवेदन पोलिस निरीक्षक, आटपाडी पोलिस ठाणे यांना देण्यात आले असून यावेळी विनायककाका पाटील, विष्णू अर्जुन, चंद्रकांत काळे, नवनाथ रणदिवे, भारत पाटील, सचिन डिगोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here