जीवनदीप प्रशालेने बदल स्विकारून स्वतःची ओळख निर्माण केली

0
244

आम. गोपीचंद पडळकर : वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : कामथ येथील जीवनदीप प्रशालेने काळातील बदल स्विकारून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. येणाऱ्या काळात हे विद्यालय पालक व मुलांसाठी आश्वासक विद्यालय असल्याचे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. आम. पडळकर यांच्या हस्ते जीवनदीप प्रशालेचा वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

 

जीवनदीप विद्यामंदिर प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन व संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष मोठया थाटामाटात साजरे झाले. तत्पूर्वी शाळेत क्रीडास्पर्धा, पारंपरिक वेशभूषा दिन वेगळ्या पद्धतीत साजरा करीत असताना गजनृत्याने कामथकरांची मने जिंकली. वार्षिक स्नेहसंमेलनात लोकप्रिय लोकगीते, लावणी, कोळीगीते, देशभक्तीपर गीते, गवळण,भारूड, बातम्या,महाकुंभ मेळयानिमित गीत, अंधश्रद्धा दूर करणारी गीते यांचा समावेश होता.

 

या प्रसंगी कामथच्या सरपंच सौ.रूपाली कारंडे, मुढेवाडी सरपंच उज्वला ऐवळे, निंबवडेचे माजी सरपंच मंगेश मगदूम, मुढेवाडी विकास सोसायटी व्हा.चेअरमन भिमराव काकडे, दामोदर मुढे,भगवान मासाळ, संस्थेचे चेअरमन महादेव चवरे, माजी चेअरमन बापूराव गरदडे, माजी उपसरपंच दशरथ कोकरे, देविदास कोकरे माजी सरपंच शिवाजी पाटील यांच्यासह प्रशालेचा सर्व स्टाफ ऊपस्थित होता. कार्यक्रमावेळी वर्षभर राबवलेल्या उपक्रमाबाबत लावलेल्या डिजीटल फ्लेक्स कौतुकाचा विषय होवून गेला.

 

आम. पडळकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना पाच हजाराच बक्षीस

वार्षिक स्नेहसंमेलन मधील मुलांचे कौतुक करताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस देवून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 

बडोदा बँकेकडून स्पीकर सेट भेट

जीवनदीप विद्यामंदिर प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन व संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष मोठया थाटामाटात साजरे झाले. यावेळी सामाजिक बांधलकीची जाणीव ठेवत बँक ऑफ बडोदा या बँकेकडून शाळेसाठी अॅम्प्लीफायर व स्पीकर सेट भेट देण्यात आले.

 

एक लाख रुपये बक्षिसे

वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वार्षिक लोकप्रिय लोकगीते, लावणी, कोळीगीते, देशभक्तीपर गीते, गवळण,भारूड, बातम्या,महाकुंभ मेळयानिमित गीत, अंधश्रद्धा दूर करणारी गीते यावर आपली नृत्यकला सादर केली. या केलेला पालकांची व गावकरी यांनी मोठी दाद देत तब्बल एक लाख सात हजार रुपयांच्या रोख बक्षीसांचा वर्षाव केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here