जॅग्वारचा मगरीवर जीवघेणा हल्ला, जबड्यात मान पकडली अन् पुढे जे काही केलं फार भयानक, धडकी भरवणारा VIDEO

0
433

Jaguar Kills Crocodile Viral Video : मगरीला पाण्यातील सर्वात भयानक शिकारी प्राणी म्हटले जाते. जरी ती शांत दिसत असली तरी एकदा का एखादी शिकार तिच्या नजरेस पडली की तिचे लचके तोडल्याशिवाय ती शांत रहात नाही, अतिशय क्रूरपणे एका झटक्यात ती त्या प्राण्याची शिकार करते. आपल्या तीक्ष्ण जबड्यात ती शिकार पाण्यात ओढत नेते. तर जॅग्वार हा जमीन आणि पाण्यात सर्वात वेगाने शिकार करू शकतो. खूप धूर्त असा हा प्राणी वेगाने शिकारीवर हल्ला करतो. अनेकदा झुडपात लपून शिकारीवर लक्ष ठेवतो आणि संधी मिळताच कोणतीही पूर्वसूचना न देता झटक्यात हल्ला करतो. या दोन प्राण्यांच्या जीवघेण्या लढाईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहूनच खूप भीती वाटते. यात जॅग्वार ज्याप्रकारे एका मगरीवर हल्ला करतोय ते पाहून अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही.

 

 

व्हिडीओत जॅग्वार आणि मगरीमध्ये एक भयंकर लढाई सुरू होते. यावेळी जॅग्वार तीक्ष्ण जबड्याने मगरीची मान पकडतो आणि नंतर असे काही करतो की पाहून धडकी भरेल. व्हिडीओत पाहू शकता की, एक जॅग्वार नदीकाठी पाणी पिण्यासाठी आला असावा, यावेळी मगरीने त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला असावा. यानंतर जॅग्वारने मगरीला पाण्यातून बाहेर काढून धडा शिकवण्याची योजना आखली असावी. कारण काही असो, पण जॅग्वारने मगरीची मान पकडली आणि अतिशय क्रूरपणे तिला मारण्याचा प्रयत्न केला.

 

 

सर्वप्रथम जॅग्वारने मगरीच्या जबड्यावर हल्ला केला. मगरीचा जबडा तोंडात पकडून खाण्याचा प्रयत्न केला. पण, काही सेकंदात त्याची पकड सैल झाली आणि मगरीने क्षणात मान वळवून पळण्याचा प्रयत्न केला, पण जॅग्वार तिच्या पाठीवर बसून राहिला आणि त्याने जबड्यात मगरीची मान पकडून आपटले आणि किनाऱ्यावर तिला फरफटत आणले, यानंतर त्याच अवस्थेत तो मगरीला घेऊन जाऊ लागला. या दरम्यान मगरीने सुटण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिला ते जमले नाही.

 

 

तो पाहिल्यानंतर लोक खूप आश्चर्य व्यक्त करत कमेंट्स करत आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, आजपर्यंत मी फक्त जॅग्वारबद्दल ऐकले होते, पण आता मी ते पाहिले आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, हा शिकारी खरोखर खूप धोकादायक आहे. तिसऱ्याने लिहिले की त्याने ज्या पद्धतीने मगरीची शिकार केली आहे ते खूप आश्चर्यकारक आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here