![Untitled](https://mandeshexpress.com/wp-content/uploads/2025/01/Untitled-19.png)
दूषित टूथब्रशचा वारंवार वापर केल्याने हे जंतू तोंडात प्रवेश करण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे हिरड्यांना आलेली सूज, पीरियडॉन्टायटीस किंवा संसर्ग होऊ शकतो.
दातांचे आरोग्य सुधारण्यासाठी केवळ ब्रश करणे, दात स्वच्छ करणेच पुरेसे नाही. त्यासाठी तुम्ही टूथब्रशची काळजी कशी घेता याकडे लक्ष देणेही खूप गरजेचे आहे. आपला टूथब्रश निर्जंतुकीकरण करायचा की नाही या प्रश्नाने ऑनलाइन चर्चेला उधाण आले आहे. कंटेंट क्रिएटर डॉ. जॉयस कांग यांच्या म्हणण्यानुसार, “टूथब्रश स्वच्छ करण्याचे अनेक मार्ग आहेत. बरेच लोक त्यांचे टूथब्रश कधीही स्वच्छ करत नाहीत आणि आपल्या शौचालयाजवळ उघड्यावर ठेवतात.”