
beneficial to drink cumin or fenugreek water : आजकाल बरेच लोकं त्यांच्या आरोग्याबद्दल पूर्वीपेक्षा जास्त सतर्क झाले आहेत. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकाना आरोग्याच्या वेगवेगळया समस्यांना समोरे जात आहे. यासाठी बहुतेक लोकं चांगल्या आरोग्यासाठी खाण्याच्या सवयी सुधारणे, सकाळी लवकर उठणे , योगा करणे आणि घरगुती उपायांचा अवलंब करणे हे आता निरोगी जीवनशैलीचा एक भाग बनले आहे. विशेषतः पोटाशी संबंधित समस्या, जसे की गॅस, अॅरसिडिटी, अपचन आणि पोट फुगणे सामान्य झाले आहेत. त्यामुळे लोकं औषधांऐवजी घरगुती उपचारांना महत्त्व देऊ लागले आहेत.
या घरगुती उपायांमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेली दोन नावे म्हणजे जिऱ्याचे पाणी आणि ओव्याचे पाणी. तसेच जिरा व ओवा हे दोन्हीही वर्षानुवर्षे पारंपारिक भारतीय स्वयंपाकघरात वापरले जात आहेत आणि आयुर्वेदातही ते पोटासाठी फायदेशीर मानले जातात. बरेच लोकं सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे व ओव्याचे पाणी पितात, परंतु प्रश्न असा आहे की या दोघांपैकी कोणते पाणी पोटांसाठी व आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे? जर तुम्हीही अशाच दुविधेत असाल तर आज आपण तज्ञांकडून हा गोंधळ दुर करूयात…
आपल्या निरोगी आरोग्यासाठी आपण रोज सकाळी जर रिकाम्या पोटी जिऱ्याचे व ओव्याचे पाणी पिणे फायदेशीर आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता यांनी सांगितले की जिरे आणि ओव्याचे पाणी दोन्ही फायदेशीर आहेत. परंतु त्यांचा परिणाम ऋतू आणि आरोग्याच्या गरजेनुसार केला पाहिजे. जसे की उन्हाळ्यात ओव्याचे पाणी खूप गरजेच्या वेळीच प्यावे. उन्हाळ्यात जिरे पाणी अधिक फायदेशीर असते कारण यात थंडावा असतो आणि पोट शांत करण्यास आणि बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लता यासारख्या अनेक समस्यांपासून मुक्त होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात जिरे पाणी पिण्याचे फायदे?
तज्ज्ञ किरण गुप्ता जी यांनी सांगितले की उन्हाळ्यात जिरे पाणी प्यायल्याने पोट थंड राहते, ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळतो. जिरे पाणी प्यायल्याने पोट साफ होते. गॅस, बद्धकोष्ठता आणि आम्लपित्त या समस्या देखील कमी होतात. तसेच, रिकाम्या पोटी जिरे पाणी प्यायल्याने चयापचय गतिमान होते, ज्यामुळे फॅट बर्न होण्याची प्रक्रिया देखील वेगवान होते.
उन्हाळ्यात ओव्याचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे?
ओव्याचे पाणी देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मासिक पाळीच्या दरम्यान पोटदुखीवर ओव्याचे पाणी फायदेशीर मानले जाते. परंतु उन्हाळ्यात जेव्हा खूप गरज असते तेव्हाच ते सेवन करावे. तज्ञांच्या मते, उन्हाळ्यात ओव्याचे पाणी प्यायल्याने अॅआसिडिटीची समस्या वाढू शकते. त्याच वेळी जर उन्हाळा नसेल तर ओव्याचे पाणी देखील खूप फायदेशीर आहे. जसे की त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे आतडे स्वच्छ करतात आणि पोटातील हानिकारक बॅक्टेरिया मारण्यास मदत करतात. ओव्याचे पाणी फॅट बर्न करण्यासाठी मदत करते, म्हणून हे पाणी वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.
( डिस्क्लेमर : यामध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)