यकृताचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काळी कॉफी पिणे फायदेशीर? वाचा, तज्ज्ञांचे मत…

0
119

सकाळी कॉफी प्यायल्याने फक्त फ्रेशच वाटत नाही, तर तो तुमच्या यकृताचे रक्षण करण्याचा सर्वांत सोपा मार्ग असू शकतो. डॉ. सीरियाक अ‍ॅबी फिलिप्स त्यांच्या मते, कॉफीमध्ये काही शक्तिशाली गुणधर्म आहेत, जे यकृताचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

 

 

त्यांनी कॉफी पिण्याचे अनेक फायदे सविस्तरपणे सांगितले. “कॉफी यकृतातील चरबीचे प्रमाण कमी करते, यकृतातील चरबीमुळे होणारी जळजळ व डाग कमी करते, फॅटी लिव्हर रोगाचे सिरोसिसमध्ये रूपांतर होण्यास प्रतिबंध करते आणि सिरोसिसच्या रुग्णांमध्ये यकृताच्या कर्करोगाचा विकास होण्यास प्रतिबंध करते किंवा कमी करते. हे कॉफीतील घटकांच्या अँटी-फायब्रोटिक, अँटी-इम्फ्लेमेटरी, अँटी कोलेस्ट्रॉल व अँटीऑक्सिडंट्स प्रभावामुळे घडते, जे बहुतेकदा क्लोरोजेनिक अॅसिड आणि कॅफिनमुळे होते.”

 

 

 

डॉ. फिलिप्स पुढे म्हणतात की, झोपण्यापूर्वी किमान चार तास आधी कॉफीचा शेवटचा कप घ्यावा. त्याशिवाय, ते म्हणतात की, कॉफीचा रक्तदाब किंवा हृदय गतीवर परिणाम होत नाही आणि रिफ्लक्स, गॅस्ट्र्टिस किंवा पोटात अल्सर होण्याचा त्रास होत नाही. यकृताच्या कर्करोगाचा धोका असलेल्या व्यक्तींनी, दररोज किमान तीन कप काळी, गोड न केलेली कॉफी प्यावी. हे फायदे मुख्यत्वे क्लोरोजेनिक अॅसिड आणि कॅफिन यांसारख्या संयुगांपासून मिळतात, जे फॅटी लिव्हर रोग सिरोसिससारख्या गंभीर स्थितीत जाऊ नये यासाठी किंवा थांबवण्यासाठी एकत्र काम करतात.

 

 

अँटी-फायब्रोटिक प्रभाव

कॉफी यकृतातील स्टेलेट पेशी सक्रिय होण्यास आणि जास्त प्रमाणात कोलेजन जमा होण्यास प्रतिबंध करते, कोलेजन हा यकृत फायब्रोसिसमधील एक प्रमुख घटक आहे.

 

 

अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म

कॉफीमधील क्लोरोजेनिक आम्ल ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते, जे यकृताची जळजळ होण्यासह नुकसानीस कारणीभूत ठरतो.

 

 

लिपिड चयापचय नियमन

कॉफीचे घटक लिपिड ऑक्सिडेशन सुधारतात, यकृतातील चरबी जमा होण्यास कमी करतात, ज्यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग (NAFLD) वाढ रोखली जाते.

 

 

परंतु, जास्त कॉफीचे सेवन (सहा कपांपेक्षा जास्त) फायदेशीर ठरू शकत नाही आणि त्यामुळे अस्वस्थता किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. अशा प्रकारे यकृताच्या फायद्यांसाठी दररोज तीन ते पाच कप काळी, गोडविरहीत कॉफी फायदेशीर ठरते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here