इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये 819 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु,वाचा सविस्तर

0
104

भारत सरकारच्या गृह विभागाच्या अतंर्गत असलेल्या इंडो तिबेटीयन पोलीस फोर्समध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आयटीबीपीमध्ये 819 पदांची भरती करण्यात येणार आहे. कॉन्स्टेबल किचन सर्विसेस या पदासाठी अर्ज दाखल पात्र उमेदवारांना अर्ज दाखल करण्यात येणार आहे. पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करु शकतात, असं सांगण्यात आलेलं आहे. पात्र उमेदवारांनी आयटीबीपीच्या वेबसाईटला भेट देऊन अर्ज दाखल करावेत. या पदावर निवड झाल्यास उमेदवारांना 21 ते 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल.

आयटीबीपीमध्ये किती जागांसाठी भरती?
आयटीबीपीमध्ये एकूण 819 जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 458, एससी प्रवर्गासाठी 48, एसटी प्रवर्गासाठी 70, ओबीसी 162 आणि ईडब्ल्यूएस 81 जागा राखीव आहेत.

शैक्षणिक पात्रता?
आयटीबीपीमध्ये कॉन्स्टेबल किचन सर्विसेस या पदासाठी अर्ज करण्यासाठी संबंधित उमेदवारानं दहावी उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. अन्न पदार्थ निर्मितीमध्ये एनएसक्यूएफ लेवल 1 चा राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळानं मान्यता दिलेल्या संस्थेतून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक असणार आहे.

अर्जाची फी किती?
आयटीबीपीमध्ये अर्ज दाखल करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागेल. तर, महिला, माजी सैनिक,एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना फी भरावी लागणार नाही. एकूण जागांपैकी 10 टक्के जागा माजी सैनिकांसाठी राखीव असतील.

आयटीपीबीमध्ये कॉन्स्टेबल किचन सर्विसेस पदासाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना 21700 ते 69100 रुपयांपर्यंत पगार मिळेल. या पदांसाठी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारले जातील. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी जाहिरात वाचून नंतरच अर्ज दाखल करावा. ईमेल आणि मोबाईल नंबर नोंदवून आयटीबीपीच्या वेबसाईटवर अर्ज दाखल करता येईल.

पीईटी, पीएसटी आणि लेखी परीक्षेनंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यानंतर पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली जाईल.

अर्ज दाखल कधी करायचा?
जे पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज दाखल करणार आहेत त्यांनी 2 सप्टेंबरनंतर आयटीबीपीच्या वेबसाईटला भेट द्या. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 1 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.

भारताच्या निमलष्करी दलांपैकी एक असलेल्या आयटीबीपीमध्ये नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज दाखल करु शकतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here