पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघ न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज; कुठे पाहणार सामना

0
59

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघ न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना आज म्हणजेच 27 जुलै, शनिवारी होणार आहे. आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारताचा न्यूझीलंडविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे, ज्यामुळे ते या सामन्यासाठी फेव्हरिट ठरतात. दोन्ही संघ ब गटात असून त्यात ऑस्ट्रेलिया, चॅम्पियन बेल्जियम, अर्जेंटिना आणि आयर्लंड यांचाही समावेश आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 105 हॉकी सामने झाले आहेत. ज्यामध्ये भारताचा वरचष्मा राहिला आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघाने 58 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंड पुरुष हॉकी संघाने 30 सामने जिंकले आहेत. दोघांमध्ये 17 सामने अनिर्णित राहिले आहेत. दोघांमधील गेल्या पाच सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर यातही भारताचाच वरचष्मा राहिला आहे. भारताने चार सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने एक सामना जिंकला आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9.00 वाजता यवेस-डु-मनोइर स्टेडियमवर खेळवला जाणार. ऑलिम्पिक हॉकी सामन्याचे थेट प्रक्षेपण Sports18 आणि Sports18 HD वर केले जाईल, त्यामुळे चाहते ते येथून पाहू शकतील. याशिवाय, त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावरही उपलब्ध असेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here