
माणदेश एक्सप्रेस न्यूज :-
नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर मतदानात घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर इंडिया आघाडीने मोठा आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर आणि राहुल गांधी व शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या खास मिटिंगनंतर ११ ऑगस्ट रोजी एकत्र येऊन निवडणूक आयोगाविरोधात ‘एल्गार’ मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत मिडीयाशी बोलताना सांगितले की, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार झाला आहे. आगामी ११ ऑगस्टला इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख पक्षांचे खासदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहेत.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगातील भ्रष्टाचार आणि मतं चोरीच्या आरोपांमुळे भाजपाच्या ‘मेंदूतली चीप’ गोंधळात असल्याचा उल्लेख करत, आपल्या पक्षाचा विश्वास अधिक ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. या मोर्चाद्वारे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या निर्णयामुळे आगामी राजकारणात नवी तहान निर्माण होणार आहे, तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही मोठ्या प्रमाणावर चर्चा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.