
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथे युवासेना शाखेचे उद्घाटन सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, पश्चिम महाराष्ट्र युवासेनेचे सचिव ऋतुराज क्षीरसागर, कार्यकारणी सदस्य शिवाजी जाधव, जिल्हाध्यक्ष मिलिंद कदम, रोहन जाधव, सचिन कांबळे यांच्या उपस्थित करण्यात आले.
आमदार सुहास बाबर, तानाजीराव पाटील यांच्या माध्यमातून गाव तिथे शाखा, शिवकार्य सदस्य नोंदणी, युवासेना बळकटीकरण करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तर, तानाजीराव पाटील यांनी रथाच्या गाडीचे पूजन करून युवासेना राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना पुढील दौऱ्यास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी उपस्थित तालुकाप्रमुख साहेबराव पाटील, बाजार समितीचे उपसभापती सुनील सरक, माणगंगा साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन ब्रम्हदेव व्हनमाने, युवा नेते दत्तात्रय पाटील, युवासेना तालुकाप्रमुख मनोज नांगरे पाटील, रमेश कातुरे, शहाजी जाधव, माजी सरपंच महादेव जुगदार, अरविंद चव्हाण,पोपट पाटील, राजेश नांगरे पाटील, मुन्नाभाई तांबोळी, शंकरबापू चव्हाण, दत्ताजीराव देशमुख, विजय देवकर, राहुल पांढरे, दौलत चव्हाण, संतोष लांडगे, जगन्नाथ लोखंडे, मधुकर ठोंबरे, भगवान पाटील माजी सरपंच अनिल मुढे, अमोल लांडगे, कल्याण काळे, संभाजी जाधव, वैभव बोराडे, बालाजी पाटील, गोपी पवार, अक्षय बनसोडे, विकास गायकवाड, संभाजी जाधव, रामभाऊ नांगरे, प्रमोद नांगरे, नानासाहेब नांगरे, राज नांगरे, राघव मेटकरी, फत्तेसिंह देशमुख, सादिक मुलाणी, संकेत लोहार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.