
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील पारेकरवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्र.- २ चा शुभारंभ गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी संदीप भंडारे म्हणाले, पारेकरवाडीतील मंजूर असलेल्या एकूण २३ लाभार्थ्यांचे गृहप्रवेशाचे कामकाज मे अखेर पूर्ण करावे. याच वेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक २ मधील ग्रामपंचायत पारेकरवाडी मधील प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भुमिपूजन केले.
सध्या पारेकरवाडीतील २३ घरकुल मंजूर झाली आहेत. तर उर्वरित घरकुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे अशी माहिती दिली. यावेळी आबासाहेब कोकरे, विस्तार अधिकारी संतोष कदम, ग्रामपंचायत अधिकारी सतिश जाधव, ग्रामपंचायत सदस्या आक्काताई डोंबाळे, वर्षा हांडे, ग्रामरोजगार सेवक पोपट पारेकर, संतोष डोंबाळे, रावसाहेब हांडे, शिपाई यशवंत बाबर, रविंद्र आवळे उपस्थित होते.