आटपाडीत चोर झाले शिरजोर अन् पोलीस झाले कमजोर

0
1659

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : शहरात सध्या भुरट्या चोऱ्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पोलिसांचे या बाबीकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्यामुळे आटपाडीत नेमकं राज्य कोणाचं? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहराच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चोर्यां च्या घटना वाढल्या आहेत. याबाबत पोलिसांकडे तक्रारीही करण्यात आहेत. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून पोलीस कमजोर झाले आहेत की काय? असा प्रश्न सध्या शहरात चर्चिला जात आहे.

 

 

आटपाडी शहरातील विठ्ठलनगर परिसर आहे. या परीसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कामगार वर्गाबरोबरच नोकरदार वर्ग याठिकाणी राहण्यास आहे. मागील चार दिवसात सलग चोऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.जेष्ठ वकील सुरेश सरगर यांच्या ऑफिसला चोरट्यांनी लक्ष केले. ऑफिस फोडत, रोख रक्कमेवर डल्ला मारला. एवढ्यावरच चोर थांबले नाहीत. त्यांनी सलग दुसऱ्या दिवशी ही याच ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला.

 

आटपाडी-निंबवडे रस्त्याला लागून असलेल्या व्हीएनएस ग्रुपच्या ऑफिसमध्ये देखील चोरट्यांनी चोरी केली. तसेच त्याच रात्री त्यांनी विठ्ठलनगरमध्ये शिरकाव करत, बाहेरून घरांना कड्यांना घालत, बंद घरामध्ये चोरी करत, घरातील भांडी लंपास केली.

 

पोलिसांची कामगिरी ही सध्या शहरांमध्ये चर्चेचा विषय असून, पोलीस आणि चोर यांची मैत्री हा सुद्धा शहरांमध्ये चर्चेचा विषय आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख व अतिरिक्त पोलीस प्रमुख यांनी शहराच्या कायदा व सुव्यवस्था यामध्ये लक्ष घालून चोरट्यांना आश्रय देणार्याप गृहखात्याच्या यंत्रणेतील घरभेद्यांची चौकशी करावी व शहरातील कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवावी अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here