“मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही” – शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान!

0
35

माणदेश एस्क्प्रेस न्यूज|राजस्थान – राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांची एक विनोदी व भावूक प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. बारान जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या जनसुनावणीत विद्यार्थिनीने इंग्रजीत प्रश्न विचारल्यावर, मंत्र्यांनी हसत हसत स्वतःचे कान पकडत म्हटलं, “मी गावचा माणूस आहे, मला इंग्रजी समजत नाही!”

 

यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला. ही विद्यार्थिनी होती दामिनी हाडा, जिला शिक्षणाच्या समस्यांबाबत शिक्षणमंत्र्यांशी थेट संवाद साधायचा होता. तिने सुरुवातीला इंग्रजीत संवाद सुरू केला. मात्र मंत्र्यांनी नम्रपणे इंग्रजी न समजल्याचे सांगत संवाद हिंदीत पुढे सुरू करण्याची विनंती केली.

 

यानंतर दामिनीने शासकीय शाळांची खालावलेली अवस्था, जीर्ण इमारती, शिक्षकांची कमतरता व अभ्याससामग्रीचा अभाव यासारख्या मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं. दामिनीने सांगितले की, अनेक विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शिक्षणात अडथळे निर्माण होत आहेत.

 

शिक्षणमंत्र्यांनी सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेतले आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. हा संवाद आणि शिक्षणमंत्र्यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यांच्या साधेपणाचं वाखाणलं जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here