
Leopard Attack Goat Video: जंगलाचा राजा सिंह याची दहशत माणसांबरोबर इतर प्राण्यांनादेखील असते. पण त्याचबरोबर वाघ, चित्ता, बिबट्या असे प्राणीदेखील खूप धोकादायक असतात. आणि जर हे खतरनाक प्राणी आजूबाजूला जरी दिसले तरी मग सळो की पळो अशी परिस्थिती निर्माण होते.
अशात बिबट्याची दहशत आता फक्त जंगलातच नव्हे तर माणसांपर्यंतही पसरलेली आहे. बिबट्याला पाहतच लोकांच्या पायाखालची जमीन हादरते आणि लोक आपला जीव वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावून पळत सुटतात. बिबट्याच्या थरारक शिकारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात बिबट्याच्या हातून शिकार होता होता वाचते.
बिबट्या सारखा खतरनाक आणि चपळ प्राणी डोंगरी शेळीची शिकार करण्याच्या प्रयत्नात फसला तरी कसा असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर एका भल्यामोठ्या डोंगराळ ठिकाणी बिबट्या जंगली शेळीची शिकार करण्यासाठी निघाला. पण शेळीने शक्कल लढवून पळून न जाता तिथेच लपून बसण्याचा निर्णय घेतला. शेळीच्या या निर्णयाने बिबट्या गाफिल राहिला आणि बिबट्याला चकवा देऊन शेळी डोंगराळ भागात एका दगडाच्या आत लपून राहिली.
शेळी त्याच दगडाच्या आत दडली होती ज्या दगडावर बिबट्या उभा होता. तसंच या शेळीबरोबर आणखी एक शळीदेखील होती जी थोड्या खालच्या अंतारावर उभी होती. उंचीमुळे बिबट्याला या दोन्ही शेळ्यांचा ठावठिकाणा लागला नाही, आणि तो शेळ्यांना शोधतंच राहिला.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “ही ओळ दोघांसाठीपण योग्य आहे”, तर दुसऱ्याने “अगदी बरोबर” अशी कमेंट केली.