“कर्णबाळा दुनबळे घरातून पत्रकार परिषद घेतो. खुलेआम आरोपी पत्रकार परिषद घेतो. त्याला पोलिसांच पाठबळ आहे का? तो का पकडला गेला नाही. त्याने चिथावणी दिली. हा तुमच्या बापाचा महाराष्ट्र नाही, इथे कायद्याच राज्य आहे. उतरला असाल, तर पूर्ण उतरा. अकोला पोलिसांनी कर्णबाळाला अभय का दिलय? तो मास्टर माईंड आहे, त्याच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला. “कर्णबाळाने वादाची ठिणगी पेटवून दिली. आम्ही एकत्र राहत होतो. सर्वांमध्ये फूट पाडली. नालायक माणूस स्वत: बिळामध्ये जाऊन लपलाय. अकोला पोलीस त्याला अटक कधी करणार? एफआयआर नोंदवून दोन दिवस झाले, तरी आरोपी पकडला जात नाही” असं अमोल मिटकरी म्हणाले.
“आमदाराच्या बाबतीत अशी परिस्थिती आहे. अकोल्यात कायदा-सुव्यवस्था किती रसातळाला गेलीय, त्याचं हे उत्तम उदहारण आहे. त्याला इतकी मस्ती का आहे? कशाच्या बळावर इतकी मुजोरी दाखवतोय? पोलिसांच अभय असल्याशिवाय हे होऊच शकत नाही” असं अमोल मिटकरी म्हणाले. “कर्णबाळा मोकाट सांडासारखा सुटलाय. माझा जीव जाईपर्यंत अकोले पोलीस वाट पाहणार का? कर्णबाळा पोलिसांचा जावई आहे का?” असे प्रश्न अमोल मिटकरी यांनी विचारले.
‘पक्षापलीकडे नाती होती’
अकोले मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि तुमचा फोटो व्हायरल होतोय. यावर मिटकरी म्हणाले की, “पंकज माझा चांगला मित्र होता. असा हल्ला करुन त्याने त्याची नैतिकता दाखवून दिली. तो चिथावणीला बळी पडला. पंकज तिथे असता, तर त्याने गाडीवर हल्ला करण्याचा मूर्खपणा केला नसता. पक्षापलीकडे नाती होती. कर्णबाळाने इथे येऊन विष कालवलय. इथे येऊन भांडण लावून दिली”
‘हरामखोराच्या बापाचा महाराष्ट्र आहे का?’
महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही फिरू देणार नाही असा कर्णबाळाने इशारा दिलाय, पत्रकारांच्या या प्रश्नावर अमोल मिटकरी चिडले, म्हणाले की, “हरामखोराच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? XXXX. एकाबापाची औलाद असेल तर मला अडवून दाखवावं. महाराष्ट्राच फिरु देणार नाही, त्याच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? अमोल मिटकरी काय आहे ते दाखवून देईल”