“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काऊंटर करून चांगलेच केले”- शर्मिला ठाकरे

0
273

“आज महिलांच्या मनात कमालीची अस्वस्थता आहे. रोज बलात्कार आणि खूनाच्या बातम्या समोर येत आहेत. राजकारणी, विरोधक आणि न्यायालय काय सांगते, याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही. मी महिलांची प्रतिनिधी म्हणून मला पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, पोलिसांनी एन्काऊंटर करून चांगलेच केले”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज दिली. उच्च न्यायालयात अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरविरोधात त्याच्या पालकांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरू असतानाच शर्मिला ठाकरे यांची ही प्रतिक्रिया आली.

आम्हाला हाच शक्ती कायदा हवा
राज्यात मागच्या चार वर्षांपासून शक्ती कायद्याची केवळ चर्चाच सुरू आहे. आम्हाला पोलिसांनी जे केले, त्याप्रकारचा शक्ती कायदा हवा. महिलांवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला शिक्षा मिळण्यात उशीर झाला तरी पीडितेला न्याय मिळत नाही. बदलापूर प्रकरणात जर चार ते पाच वर्ष केस चालली असती तर आज ज्या पीडिता चिमुकल्या मुली आहेत. त्यांना पाच ते सहा वर्षांनंतर काहीही आठवणार नाही. त्यामुळे अशा प्रकरणात दोन ते तीन महिन्यातच निकाल लागले गेले पाहीजेत, अशीही मागणी शर्मिला ठाकरे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here