कारले आवडत नाही,पण कधी ‘क्रिस्पी फ्राय कारली’ खाऊन बघितली का?एकदा नक्की ट्राय करा.

0
539

कारल्याच नाव काढल तर लहान मुलेच काय सगळेच नाक मुरडतात,पण याच कारल्यापासून बनवून पहा ‘क्रिस्पी फ्राय कारली’.करायला ही सोपी, खायला एकदम कुरकुरीत आणि सगळे आवडीन खातील.

घटक
15 मिनिटे
4 ते 5 सर्व्हिंग्ज
• 1/4 किलो कारली
• 1 चमचा लाल मसाला
• 1 चमचा हळद
• 1 चमचा चाट मसाला
• 1/2 चमचा काळ मीठ
• चवीप्रमाणे मीठ
• तळण्यासाठी तेल
• 2 चमचे बेसन
• 2 चमचे तांदळाचे पीठ

कुकिंग सूचना
1
प्रथम कारले स्वच्छ धुऊन ते क्रॉस पातळ कापून घ्यावी कापल्यानंतर त्यात मसाला,हळद,मीठ,काळ मीठ,चाट मसाला,घालावा.
2
सर्व मसाले मिक्स करून दहा मिनिटे ठेवून देणे त्यानंतर बेसन व तांदळाचे पीठ घालून चांगले एकजीव करावे.
3
गॅस वर कढई ठेऊन त्यात तेल घालावे व ते चांगले गरम झाल्यावर थोडा फास्ट गॅसवर पीठ लावलेले कारले चांगले लाल होईपर्यंत तळावे क्रिस्पी कारले खाण्यास तयार.