घरात किती रोकड ठेवली तर सुरक्षित? आयकर विभाग काय म्हणतो?

0
228

माणदेश एक्सप्रेस न्यूज :-
आजकाल जवळपास सर्वच व्यवहार डिजिटल पद्धतीने होतात. वीज बिल भरणं असो, मोबाईल रिचार्ज, शॉपिंग किंवा इतर व्यवहार – बहुतेक सगळं ऑनलाइन पद्धतीने केलं जातं. तरीसुद्धा अनेक वेळा काही कारणांसाठी लोकांना रोकड रकमेची (Cash) गरज भासते. त्यामुळे अनेकजण सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी घरात मोठ्या प्रमाणात रोकड ठेवतात.

मात्र, लोकांच्या मनात नेहमीच एक प्रश्न निर्माण होतो की – घरात नेमकी किती रोकड ठेवण्याची परवानगी आहे? आयकर विभागाने यासाठी काही मर्यादा निश्चित केल्या आहेत का?


आयकर विभागाच्या नियमांनुसार घरात रोकड ठेवण्यावर कोणतंही बंधन नाही. म्हणजेच तुम्ही तुमच्या घरात कितीही पैसे ठेवू शकता. घरात किती रोकड ठेवली आहे यावरून तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

  • जर कधी आयकर विभागाने तुमच्या घरावर छापा टाकला, तर तुमच्याकडे असलेल्या रोकड पैशांचा योग्य स्रोत (Source of Income) सांगता आला पाहिजे.

  • तुमच्याकडे असलेले पैसे कुठून आले, कसे मिळाले, याचे स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे.

  • पगार, व्यवसायातील नफा, मालमत्ता विक्री, शेअर मार्केट किंवा इतर वैध स्रोत यातून पैसा आला आहे हे तुम्ही दाखवू शकलात, तर तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

  • पण जर पैशाचा स्रोत तुम्ही सांगू शकला नाही, तर तपास होऊन कारवाई होऊ शकते.


  1. रोकड ठेवण्यावर मर्यादा नाही – पण पैशाचा स्रोत वैध असावा.

  2. छापा पडल्यास चौकशी होऊ शकते – अशा वेळी पुरावे (Salary Slip, व्यवसायाचे अकाउंट्स, विक्रीचे कागदपत्र इ.) दाखवणं गरजेचं आहे.

  3. अनधिकृत पैसा (Black Money) घरात ठेवला असेल, तर आयकर विभागाकडून मोठी कारवाई होऊ शकते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here