आजचे राशी भविष्य 30 October 2024 : “या” राशींच्या लोकांनो आजच्या दिवशी सावध राहा, नाही तर? तुमच्या राशीत काय आहे योग? ; वाचा सविस्तर

0
8871

मेष राशी
कुटुंबात एखाद्या कामाबाबत विचार विनिमय कराल. कार्यक्षेत्रात विचार करूनच तुमचं मत मांडा. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचं संपूर्ण सहकार्य मिळेल. एखादं काम दीर्घ काळापासून सुरू असेल तर ते आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. घरात कुरबुरी होतील. काही कारणाने पत्नीशी वाद होतील. आईकडून एखादं जबाबदारीचं काम दिलं जाईल. एखाद्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवत असाल तर तसं करू नका. नाही तर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

 

वृषभ राशी
कुटुंबासोबत आज दिवस घालवाल. एखादी समस्या असेल तर ती बऱ्यापैकी दूर होईल. धार्मिक कार्यात रस घालाल. व्यापारात तुम्हाला लाभ मिळेल. वडिलांची एखादी गोष्ट पटणार नाही. तुमच्या एखाद्या जुन्या चुकीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात वादळ येऊ शकतं. जीवनसाथीसोबत अनबन होईल. दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागतील.

 

मिथुन राशी
तुम्हाला तुमच्या कामांच्या योजना आखाव्या लागतील. तुमच्या वाढत्या खर्चांना आळा घाला. कुणाकडूनही पैसे उधार घेताना विचार करूनच घ्या. एखाद्या जुन्या मित्राची आज बऱ्याच वर्षानंतर भेट होईल. मित्राला भेटल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही बदल करायचे असतील तर आजचा दिवस चांगला आहे. बदल करून घ्या. गावाकडे जाण्याचा योग आहे. दिवाळीच्या खरेदीचा मोठा फटका बसेल.

 

कर्क राशी
एखादं नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. तुमचे बुडालेले पैसे परत मिळण्याचीही शक्यता आहे. बऱ्याच कालावधीपासून एखादं काम रेंगाळलेलं असेल तर ते आज मार्गी लागेल. घाईघाईत आणि भावूक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. एखादी समस्या असेल तर ती दूर होईल. वडिलांसोबत खटपट होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. गृहिणींना आज खरेदीतून वेळच मिळणार नाही. नोकरदार महिलांसाठी आजचा दिवस दगदगीचा असणार आहे.

 

सिंह राशी
सरकारी योजनेचा तुम्ही पुरेपूर लाभ उचलाल. व्यवसायात एखादी चांगली संधी मिळेल. तुमचं दीर्घकाळापासून अडलेलं काम मार्गी लागेल. तुमचं मत व्यक्त करताना त्यात बॅलन्स ठेवा. तुमच्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा. गावाला जाताना जपून. शक्यतो दूरचा प्रवास टाळा. आज धार्मिक आणि सामाजिक कार्यात अधिक सहभागी व्हाल. समाजिक क्षेत्रात तुमचा गौरव होण्याची शक्यता आहे. राजकारणातील व्यक्तीसाठी आजचा दिवस भेटीगाठींचा ठरेल. दिवाळी निमित्ताने खर्च वाढणार आहे.

 

कन्या राशी
लग्न समारंभाला हजेरी लावाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्यांना आज आनंदाची बातमी मिळू शकते. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे. जुना आजार डोकं वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. प्रेयसीसोबत खटके उडू शकतात. आजचं काम आजच करा, उद्यावर ढकलू नका. नाही तर अडचणी वाढतील.

 

तुळ राशी
तुम्हाला आज मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. जीवनसाथीसोबत जुळवून घ्या. आईवडिलांच्या आशीर्वादाने तुमचं अडलेलं काम मार्गी लागेल. एखाद्या नव्या कामात तुमची रुची वाढेल. मालमत्तेच्या प्रकरणात लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन कपडे खरेदी कराल. जुनी उधार उसनवारी मार्गी लागेल. आज एखादं वाहन खरेदी करण्याचा योग आहे. सोन खरेदी करण्यावर आज तुमचा कटाक्ष असेल. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.

 

वृश्चिक राशी
तुम्हाला छोट्या मोठ्या योजनांवर लक्ष द्यावं लागणार आहे. कौटुंबिक प्रकरणात तुम्हाला लक्ष घालावं लागेल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणार असाल तर तिथे तुमचे विचार आवश्य मांडा. शेजाऱ्याशी भांडण होण्याची शक्यता आहे. सोसायटीच्या मिटिंगमध्ये मुद्दे मांडताना आक्रमक होऊ नका. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. आज तुम्हाला प्रचंड खर्च करावा लागणार आहे. मोठेपणाच्या नादात तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

 

धनु राशी
तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. कोर्टकचेरीच्या कामात यश येईल. कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. जीवनसाथीला सरप्राईज गिफ्ट द्याल. घरातील वाद सोडवण्यावर भर द्या. एखादी गोष्ट पटकन पूर्ण कराल. वरिष्ठांची तुमच्यावर मर्जी बसेल. गावाला जाण्याचा योग आहे. दूरच्या प्रवासामुळे थकवा जाणवेल.

 

मकर राशी
तुमची एखादी डील आज फायनल होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. व्यवसायात पार्टनरशीप असणं महत्त्वाचं आहे. कुणालाही उधार देताना विचार करा. लग्नाळूंना आज स्थळ सांगून येईल. प्रेमीयुगुलांसाठी आजचा दिवस अत्यंत संस्मरणीय ठरणार आहे. आई वडिलांनी सांगितलेल्या गोष्टींकडे कानाडोळा करू नका. घरात बायकोशी वाद होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात टंगळमंगळ करू नका.

 

कुंभ राशी
तुमची एखादी माहिती अनोळखी व्यक्तीकडे शएअर करू नका. नाही तर तुमचा गैरफायदा उचलला जाईल. कौटुंबिक जीवनात असणाऱ्यांची आज फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर वाजवीपेक्षा विश्वास ठेवा नका. आरोग्याची काळजी घ्या. आज तब्येतीची कुरकुर जाणवेल. वाहन चालवताना काळजी घ्या, जास्त लांबचा प्रवास करू नका. कर्ज घेण्यासाठी तुम्ही अर्ज केला असेल तर आज तुमचं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे.

 

मीन राशी
तुमच्या कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला आनंदाची बातमी सांगण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वाद दूर होतील. प्रेयसीशी भांडण होईल. मालमत्तेशी संबंधित डील फायनल होईल. गावाला जाण्याचा योग आहे. घरातील बुर्जुर्ग व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता आहे. कुणालाही आवाजवी आश्वासन देऊ नका. एखाद्या कामाबाबत त्रस्त व्हाल. अस्वस्थ वाटेल. शेजारच्याशी गोडी गुलाबीने वागा. कोर्टकचेरीच्या कामापासून मुक्ती मिळले.

 

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)