
मेष राशी (Aries Horoscope)
तुमचे मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. राजकारणातील लोक उच्च पदे मिळवू शकतात. तुम्हाला नकोशा प्रवासाला जावे लागेल. नोकरीत पदोन्नतीचे होण्याचे संकेत आहेत.
वृषभ राशी (Taurus Horoscope)
व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जवळीकतेचा फायदा तुम्हाला मिळेल. मुलांची एखादी मागणी पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला तुमची बचत काढून पैसे खर्च करावे लागू शकतात.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
भाऊ-बहिणींसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. तुमच्या आजी-आजोबांकडून काही आनंदाची बातमी मिळाल्यावर तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. सासरच्या लोकांकडून वाढत्या हस्तक्षेपामुळे पती-पत्नीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो.
कर्क राशी (Cancer Horoscope)
आजारामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.पण तुमचे औषध वेळेवर घ्या आणि नीट खबरदारी घ्या. बाहेरचे पदार्थ खाणं टाळा.
सिंह राशी (Leo Horoscope)
राजकारणात तुमच्या विरोधकांवर मात कराल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये, निर्णय तुमच्या बाजूने लागेल. तुम्ही व्यवसायाच्या सहलीवर जाऊ शकता. मुलांना त्यांच्या आईकडून आनंदाची बातमी, कपडे आणि भेटवस्तू मिळतील. व्यवसायात नवीन सहकारी फायदेशीर ठरतील.
कन्या राशी (Virgo Horoscope)
आज कर्ज घेण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. व्यवसायात सहकाऱ्यांमुळे आर्थिक फायदा होईल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला तुमची आवडती भेट मिळेल.
तुळ राशी (Libra Horoscope)
एखाद्या प्रिय व्यक्तीपासून दूर जावे लागू शकते. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून पाठिंबा आणि साथ मिळाल्याने तुम्ही भारावून जाल. कुटुंबात एका नवीन सदस्याचे आगमन होईल.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
तब्येत एकदम ठणठणीत असेल. कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असाल तर तुम्हाला खूप आराम मिळेल.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
वडिलांशी अचानक मतभेद होऊन भांडण होऊ शकतं.कामाच्या ठिकाणी खूपच ताण जाणवेल. दुसऱ्याच्या भांडणात सहभागी होऊ नका. नाहीतर तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. व्यवसायात कठोर परिश्रम करूनही अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने तुम्ही नाखूष असाल.
मकर राशी (Capricorn Horoscope)
जीवनशैलीमुळे बेफिकीरपणे खर्च कराल. तुमच्या फालतू खर्चामुळे कुटुंबात अनावश्यक वाद होऊ शकतात. वडिलोपार्जित जंगम आणि अचल मालमत्तेशी संबंधित प्रकरणातील वकिलांमुले तुमची आर्थिक स्थिती कमकुवत असेल.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
कुटुंबात काही शुभ कार्यक्रम घडतील. नातेसंबंध अधिक दृढ होतील. पण प्रेम प्रकरणात संशय वाढल्याने निरर्थक वाद होऊ शकतात. ज्यामुळे मन दुःखी राहील.
मीन राशी (Pisces Horoscope)
व्यवसायात परिश्रमपूर्वक काम करा. नक्कीच यश मिळेल. परीक्षेत आणि स्पर्धेत यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक वाढेल. विद्यार्थी अभ्यासाबाबत उदासीन राहतील.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)