
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आटपाडी येथे रविवार दिनांक ०९ रोजी जवळे मल्टीपर्पज हॉल येथे खास महिलासाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, नृत्य स्पर्धा व विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आरपीआयच्या तालुकाध्यक्ष सुष्मिता मोटे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सिने अभिनेता सोमनाथ पाटील असून ते होम मिनिस्टर कार्यक्रम करणार आहेत. या कार्यक्रमासाठी सोनिया बाबर, मनिषा पाटील, वृषाली धनंजय, अश्विनी तोरणे, निकिता लोंढे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. तर सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुष्मिता मोटे यांनी केले आहे.