राज्यभरात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा; कमाल तापमान वाढले

0
76

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. विदर्भात सरासरी ३२ ते ३५, मराठवाड्यात सरासरी ३३ ते ३५, मुंबईसह किनारपट्टीवर २८ ते ३० आणि मध्य महाराष्ट्रात ३३ ते ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणाच्या वरच्या स्तरात वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अटकाव निर्माण झाला आहे. त्यामुळे थंड वारे राज्यापर्यंत पोहचत नाहीत. दुसरीकडे दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

 

 

तापमान आणखी वाढणार सध्या कमाल तापमानात झालेली वाढ आणखी दोन – तीन दिवस कायम राहणार आहे. त्यानंतर चार – पाच दिवस कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होईल. उत्तरेकडून येणारे थंड वारे आपल्यापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे तापमान वाढीचा सामना करावा लागत आहे. कमाल तापमानात झालेली वाढ पुढील आठवडाभर कायम राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी व्यक्त केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here