
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | हेल्थ डेस्क :
पावसाळा सुरू झाला की अनेकांना त्वचेच्या आणि आरोग्याच्या समस्या जाणवू लागतात. या काळात केस गळणे, त्वचा कोरडी होणे किंवा पायांच्या टाचांना भेगा पडणे ही सामान्य बाब आहे. पावसाच्या पाण्यात असलेले चिखल, बॅक्टेरिया आणि प्रदूषण यामुळे टाचांना भेगा पडण्याचे प्रमाण अधिक वाढते. एकदा टाचांना भेगा पडायला लागल्या की चालणे कठीण होते, वेदना होतात, खाज सुटते आणि कधी कधी संसर्गही होऊ शकतो. त्यामुळे ही समस्या किरकोळ समजून दुर्लक्ष न करता त्वरित काळजी घेणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात टाचांना भेगा का पडतात?
पावसाच्या पाण्यातील बॅक्टेरिया आणि चिखलामुळे त्वचा खराब होते.
सतत ओलेपणा राहिल्याने पायांची त्वचा कोरडी व नाजूक होते.
योग्य वेळी स्वच्छता न केल्यास संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
घरगुती उपाय :
पावसाळ्यात टाचांच्या भेगांवर खालील घरगुती उपाय केल्यास आराम मिळू शकतो.
1) नारळ तेल वापरा
नारळाच्या तेलात नैसर्गिक मॉइश्चरायझिंग आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुऊन टाचांवर नारळ तेल लावल्यास खाज सुटणे, जळजळ आणि वेदना कमी होतात.
2) कोरफड जेल (Aloe Vera Gel)
कोरफड त्वचेचा कोरडेपणा कमी करून भेगा भरून काढण्यास मदत करते. पाय धुऊन कोरडे करून रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेल लावल्यास टाचांना थंडावा मिळतो आणि त्वचा लवकर बरी होते.
3) कडुलिंबाच्या पानांचे पाणी
कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. पानांचे पाणी उकळून ते कोमट करून त्यात पाय 10 मिनिटे ठेवल्यास खाज, जळजळ कमी होते आणि संसर्ग बरा होण्यास मदत होते.
4) ट्री-ट्री ऑईल
ट्री-ट्री ऑईलमध्ये अँटी-बॅक्टेरियल व अँटी-फंगल गुणधर्म आहेत. हे ऑईल इतर एखाद्या आवश्यक तेलात मिसळून टाचांवर लावल्यास भेगा लवकर भरून येतात. झोपण्यापूर्वी नियमित वापर केल्यास आराम मिळतो.
तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक
जरी हे उपाय घरच्या घरी करता येतात, तरी भेगा खोल झाल्या असतील, संसर्ग वाढला असेल किंवा वेदना तीव्र होत असतील तर तातडीने त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. बाजारात उपलब्ध काही औषधे व क्रीम्सही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरता येतात.
👉 (डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व घरगुती उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)