तुम्ही कधी निळा चहा प्यायलाय का? जाणून घ्या आरोग्यासाठीचे अनोखे फायदे…

0
107

माणदेश एक्सप्रेस न्यूज | हेल्थ डेस्क :
आजच्या धावपळीच्या आयुष्यात लोक सकाळची सुरुवात गरमागरम दुधाच्या चहाने करतात. मात्र दुधाचा चहा आरोग्यासाठी फारसा हितकारक नसतो, हे आपण सर्वजण जाणतो. उलट तो पोटात आम्लता, छातीत जळजळ, थकवा यांसारख्या समस्यांना आमंत्रण देतो. अशावेळी चहा प्रेमींसाठी एक आरोग्यदायी पर्याय उपलब्ध आहे – ब्लू टी अर्थात अपराजिता फुलांचा चहा. हा चहा केवळ दिसायलाच सुंदर नाही तर शरीर आणि मनासाठीही अमृतासमान आहे.


ब्लू टी म्हणजे काय?

ब्लू टी हा क्लिटोरिया टर्नेटिया (Clitoria Ternatea) या अपराजिता नावाच्या फुलापासून बनवला जातो. या फुलांच्या निळ्या पाकळ्यांमुळे तयार झालेल्या चहाला मोहक निळा रंग मिळतो. याला बटरफ्लाय पी टी किंवा नीलकमळ चहा असेही म्हणतात. आयुर्वेदातही या चहाला महत्वाचे स्थान आहे.


ब्लू टीचे आरोग्यदायी फायदे

🔹 शरीर विषमुक्त ठेवतो :
ब्लू टीमध्ये नैसर्गिक डिटॉक्स गुणधर्म आहेत. हा चहा प्यायल्याने लघवीचा प्रवाह सुधारतो आणि शरीरातील घातक विषारी पदार्थ सहज बाहेर टाकले जातात.

🔹 ताण कमी करतो व सतर्कता वाढवतो :
ब्लू टीमध्ये कॅफिन नसतानाही तो ताजेतवाने करतो. तो पिल्यानंतर ताण कमी होतो, आळस दूर होतो आणि दिवसभर उत्साही वाटते.

🔹 मेंदूसाठी उपयुक्त :
या चहात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स मेंदूला सक्रिय ठेवतात. स्मरणशक्ती सुधारण्यास आणि मेंदूच्या पेशींचे रक्षण करण्यास ब्लू टी उपयुक्त मानला जातो.

🔹 रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो :
सकाळी रिकाम्या पोटी ब्लू टी घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी दिवसभर संतुलित राहते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा चहा फायदेशीर ठरू शकतो.

🔹 डोळ्यांसाठी फायदेशीर :
या चहातील घटक डोळ्यांमध्ये रक्तप्रवाह सुधारतात. त्यामुळे दृष्टी टिकवून ठेवण्यास आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

🔹 सांधेदुखीवर उपाय :
ब्लू टीमध्ये असलेले दाहक-विरोधी (Anti-inflammatory) गुणधर्म सांधेदुखी कमी करण्यात मदत करतात. दररोज सकाळी घेतल्यास शरीरातील वेदना हळूहळू कमी होतात.


ब्लू टी कसा बनवायचा?

  • अपराजिता फुलांच्या ५ ते ६ वाळलेल्या पाकळ्या एक ते दीड कप पाण्यात टाका.

  • ते पाणी ५ ते १० मिनिटे उकळा.

  • तयार झालेला चहा गाळून त्यात थोडासा मध आणि काही थेंब लिंबाचा रस घाला.

  • लक्षात ठेवा – या चहात साखर घालू नका.


सेवन करताना घ्यावयाची काळजी

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आरोग्यासाठी घातक असतो. त्यामुळे ब्लू टी मर्यादित प्रमाणातच प्यावा. दररोज १ ते २ कप इतके प्रमाण पुरेसे आहे.


👉 तर आता दुधाच्या चहाला पर्याय म्हणून एकदा तरी ब्लू टी जरूर ट्राय करा आणि त्याचे आरोग्य फायदे अनुभवा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here