घरनिकीत गारपीट, खरसुंडीत पावसाचा शिडकावा

0
200

माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/घरनिकी (प्रतिनिधी): आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात शनिवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. खरसुंडी व घरनिकी परिसरात हा पाऊस कोसळला. विशेषतः घरनिकी गावात गारपिटीसह जोरदार पावसाचा अनुभव आला.

 

दुपार पासूनच ढगाळ वातावरण झाले होते. पाच वाजण्याच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले. काही वेळातच वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. घरनिकीत काही भागांत गारपीट झाली. त्यामुळे जनतेला थोडीशी धांदल उडाली. काही शेतकऱ्यांच्या उरलेल्या पिकांवर याचा थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे. खरसुंडी परिसरात पावसाचा जोर कमी होता, मात्र हवामानात सुखद गारवा निर्माण झाला. यामुळे उन्हाच्या कडाक्याने त्रस्त झालेल्या जनतेला थोडासा दिलासा मिळाला.

 

गेल्या काही दिवसांपासून तापमान प्रचंड वाढले होते. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाने थोडीशी राहत दिली असली, तरी पुढील पावसासाठी शेतकरी अजूनही आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here