
आजच्या आधुनिक जीवनशैलीत चमचा, काटा किंवा फॉर्क वापरून जेवणं ही एक फॅशन झाली आहे. विशेषतः तरुणांमध्ये याची क्रेझ मोठ्या प्रमाणावर दिसते. पण आयुर्वेद आणि आरोग्यतज्ज्ञांच्या मते, हाताने जेवणे ही केवळ भारतीय संस्कृतीची परंपरा नसून आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर सवय आहे.
✦ हाताने जेवल्याचे आरोग्यदायी फायदे :
पचनशक्ती सुधारते –
आयुर्वेदानुसार, हाताने जेवताना बोटांचा स्पर्श तोंडाच्या वरच्या भागाला होतो. त्यामुळे पचनशक्ती उत्तेजित होते. तसेच हातावर उपस्थित असलेले चांगले बॅक्टेरिया जेवणासोबत शरीरात जातात, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.मधुमेहापासून बचाव –
चमच्याने जेवणारे लोक तुलनेने जलद खातात. घाईघाईत खाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी असंतुलित होते आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढतो. हाताने जेवताना आपण सावकाश खातो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.स्नायूंचा व्यायाम व रक्ताभिसरण सुधारणा –
हाताने अन्न खाल्ल्याने हातांच्या स्नायूंना नैसर्गिक व्यायाम मिळतो. यामुळे सांधे मजबूत होतात आणि रक्ताभिसरण सुरळीत राहते.तापमानाचा अंदाज –
आपले हात नैसर्गिक सेन्सरसारखे काम करतात. जेवणाचे तापमान हाताने लगेच समजते, त्यामुळे गरम पदार्थामुळे जीभ पोळण्याचा धोका राहत नाही.संवेदनांचा अनुभव व जास्त खाण्यापासून बचाव –
हाताने जेवल्याने अन्नाशी एक भावनिक नातं तयार होतं. स्पर्श, वास आणि चव यांचा समन्वय होतो. त्यामुळे जेवण अधिक आनंददायी वाटते. शिवाय आपण किती खात आहोत, हे सहज लक्षात येतं आणि अति खाणं टाळता येतं.संस्कृतीशी नातं जपणं –
हाताने जेवण ही भारतीय संस्कृतीतील जुनी परंपरा आहे. यामुळे आपल्या वारशाशी जोडलेपण टिकून राहतं.
✦ स्वच्छतेची काळजी घ्या :
हाताने जेवण्याचे फायदे तेव्हाच मिळतात, जेव्हा स्वच्छतेची काटेकोरपणे काळजी घेतली जाते. जेवणाआधी साबणाने हात धुणे आवश्यक आहे. अन्यथा अन्नासोबत जंतू पोटात गेल्यास फूड पॉयझनिंगसारख्या समस्या उद्भवू शकतात.
हाताने जेवण ही केवळ एक पारंपरिक पद्धत नाही, तर आरोग्यासाठी लाभदायी आणि वैज्ञानिकदृष्ट्या फायदेशीर सवय आहे. आधुनिक जीवनशैलीत चमचा किंवा काटा वापरणं सोयीचं वाटतं, मात्र हाताने जेवणं ही अधिक आरोग्यसंपन्न, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि आनंददायी पद्धत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.