
माणदेश एक्सप्रेस न्यूज | हेल्थ डेस्क
अनेकदा आपण बघतो की काही लोकांची त्वचा एकूणच स्वच्छ, उजळ दिसते. परंतु हातांच्या कोपरांवर, गुडघ्यांवर आणि काही वेळा मानेला काळपटपणा जाणवतो. हा काळपटपणा इतका ठळक होतो की अनेक महिलांना आवडते कपडे घालतानाही संकोच वाटतो. त्वचेच्या या भागांकडे योग्य वेळी लक्ष न दिल्यास हा डार्कनेस अधिक वाढतो.
तज्ज्ञांच्या मते, जास्त घाम येणे, डेड सेल्स जमा होणे, त्वचेची नीट काळजी न घेणे आणि सतत धुळीत व उन्हात राहणे यामुळे या भागांवर टॅनिंग वाढते. अशा वेळी महिला महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात. मात्र त्याचा परिणाम मर्यादित होतो. अशा वेळी एक सोपा आणि घरच्या घरी करता येणारा टोमॅटोचा खास उपाय खूप प्रभावी ठरू शकतो.
टॅनिंग दूर करणारा टोमॅटोचा घरगुती उपाय
त्वचेवरील काळपटपणा कमी करण्यासाठी लागणारे घटक:
टोमॅटो
कॉफी
तांदळाचं पीठ
दही
लिंबाचा रस
कृती :
१. एक टोमॅटो बारीक करून त्याची पेस्ट तयार करा.
२. त्यात अर्धा चमचा कॉफी घाला.
३. एक चमचा तांदळाचं पीठ टाका.
४. त्यात दही आणि काही थेंब लिंबाचा रस मिसळा.
५. ही पेस्ट नीट मिक्स करून गुडघे, कोपरं आणि काळपट भागांवर लावा.
६. १० ते १५ मिनिटं तसेच ठेवा.
७. नंतर गुलाबजलाने साफ करा, कपड्यानं पुसा आणि शेवटी स्वच्छ पाण्यानं धुवा.
हा उपाय आठवड्यातून किमान ३ वेळा केल्यास काही दिवसांतच फरक जाणवू शकतो.
टोमॅटोचे फायदे त्वचेसाठी
एक्सफोलिएशन: टोमॅटोमध्ये असलेले फ्लेवोनॉइड्स आणि पेक्टिन त्वचेवरील डेड सेल्स काढून टाकतात.
त्वचा उजळते: यात असलेले व्हिटामिन सी आणि लायकोपीन त्वचेवरील टॅनिंग कमी करून उजळपणा आणतात.
सुरक्षात्मक गुणधर्म: टोमॅटोतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला सूर्याच्या किरणांपासून आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात.
नैसर्गिक परिणाम: या उपायामुळे त्वचेला कोणताही साइड इफेक्ट होत नाही.
गुडघे आणि कोपरांवरील काळपटपणामुळे महिलांना अनेकदा कॉन्फिडन्स कमी होतो. महागडे प्रॉडक्ट्स न वापरता, घरच्या घरी सोपा आणि नैसर्गिक उपाय करून हा त्रास कमी करता येऊ शकतो. नियमितपणे टोमॅटोचा हा फेसपॅक वापरल्यास नक्कीच फरक जाणवेल आणि त्वचा अधिक उजळ आणि आकर्षक दिसेल.