बँकेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी; पगार 50 हजार, जागा 4455,कसा कराल अर्ज?

0
448

ज्या युवकांना बँकेत नोकरी (Bank Job) करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. पदवीचं शिक्षण घेणाऱ्या युवकांसाठी ही मोठी संधी आहे. कारण 4455 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु झाली असून, 50 हजार रुपयांचा पराग देखील मिळणार आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन प्रोबेशनरी ऑफिसरच्या 4455 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आजपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तुम्हाला बँकेत नोकरी मिळवायची असेल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी असू शकते. IBPS ने 4455 PO पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ही पदे प्रोबेशनरी ऑफिसर्स/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (CRP PO/MT) साठी आहेत. यासाठीचे अर्ज आजपासून म्हणजेच गुरुवार, 1 ऑगस्ट, 2024 पासून सुरु झाले आहेत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024
IBPS PO च्या या पदांसाठी अर्ज आजपासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज संपादित करण्याची ही शेवटची तारीख आहे. तुमचा अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2024 आहे. ऑनलाइन फी देखील 1 ते 21 ऑगस्ट दरम्यान जमा करणं गरजेचं आहे.

20 ते 30 वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात
अर्ज फक्त ऑनलाइन केले जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. याचा पत्ता हा ibps.in. येथून अर्ज करण्यासोबतच या पदांचा तपशीलही जाणून घेता येईल. पुढील अपडेट्सचीही माहिती मिळू शकेल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असणे आवश्यक आहे. 20 ते 30 वयोगटातील उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे जी वर्षातून एकदा घेतली जाते. दरवर्षी ४ ते ५ लाख उमेदवार या परीक्षेला बसतात.

अर्जाची फी किती?
अर्ज करण्यासाठी, सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, PH श्रेणीतील उमेदवारांसाठी 175 रुपये शुल्क आहे.

उमेदवारांची निवड कशी होणार?
परीक्षांच्या अनेक फेऱ्या पार केल्यानंतर या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. सर्व प्रथम, पूर्व परीक्षा घेतली जाईल जी एक तासाची असेल. यानंतर मुख्य परीक्षा होईल जी 3 तास 30 मिनिटांची असेल. पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग असून हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये परीक्षा घेतली जाते. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला तिन्ही टप्पे पार करावे लागतील.

कोणत्या बँकेत किती जागा?
बँकांमधील अनेक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. बँक ऑफ इंडिया – 885 पदे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया – 2000 पदे, कॅनरा बँक – 750 पदे, इंडियन ओव्हरसीज बँक – 260 पदे, पंजाब नॅशनल बँक – 200 पदे, पंजाब आणि सिंध बँक – 360 पदे आहेत.

परीक्षा कधी ?
प्रिलिम्स परीक्षा ही ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. तर मुख्य परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होईल. त्याचा निकाल डिसेंबर 2024 किंवा जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध होईल. जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये मुलाखती घेतल्या जाऊ शकतात. निकाल एप्रिल 2025 मध्ये जाहीर केला जाऊ शकतो. दरम्यान, तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.

पगार किती?
मूळ वेतन 36,000 रुपये आहे, उर्वरित भत्ते आणि कपातींचा समावेश केल्यानंतर, उमेदवारांना दरमहा सुमारे 52 हजार रुपये वेतन मिळते. इतर भत्तेही दिले जातात. याविषयी किंवा इतर महत्त्वाच्या तपशीलांसाठी वेबसाइटवर दिलेल्या सूचना तपासा.