शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता लवकरच येणार!

0
227

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई: देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २० जून रोजी हा हप्ता जारी केला जाऊ शकतो. मात्र, अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.

 

योजनेचा उद्देश:
PM-KISAN योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बियाणे, खते आणि इतर तातडीच्या खर्चांसाठी मदतीची गरज भासणार नाही. भारत सरकार दरवर्षी प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ६,००० रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करते. या मदतीचे तीन हप्त्यांमध्ये वितरण केले जाते, म्हणजे २,००० रुपयांचे तीन हपते दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात येतात.

 

२० व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत शेतकरी:
पंतप्रधान मोदींनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी बिहार दौऱ्यात या योजनेचा १९ वा हप्ता शेवटचा जारी केला होता. त्यानंतर शेतकरी २० व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २० जून रोजी हा हप्ता जारी होऊ शकतो, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

eKYC पूर्ण न केल्यास पैसे मिळणार नाहीत!
तुम्ही PM-KISAN योजनेचा लाभ मिळवण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ओटीपी आधारित eKYC (ई-केवायसी) करणे अनिवार्य आहे. जर तुमचे eKYC पूर्ण नसेल, तर तुमच्या खात्यात हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप eKYC केले नाही, त्यांनी ते त्वरित पूर्ण करून घ्यावे.

 

PM Kisan यादीत तुमचे नाव कसे तपासावे?
तुम्हाला २० वा हप्ता मिळणार की नाही, हे तपासणे खूप सोपे आहे. तुम्ही खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून तपासू शकता:

  • पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
  • ‘लाभार्थी यादी’ (Beneficiary List) या बॉक्सवर क्लिक करा.
  • तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडायचे आहे.
  • सर्व माहिती भरल्यानंतर ‘गेट रिपोर्ट’ (Get Report) वर क्लिक करा.
  • तुमच्या स्क्रीनवर सर्व लाभार्थ्यांची यादी दिसेल, जिथे तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल:
PM-KISAN योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिकदृष्ट्या मोठा बदल घडवला आहे. या योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित तातडीच्या खर्चांना तात्काळ पूर्ण करणे शक्य झाले आहे. त्यामुळे, हे योजने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा एक महत्त्वपूर्ण साधन ठरली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here