Gold Silver Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी : १० ग्रॅम सोन्याचा भाव काय? वाचा सविस्तर

0
4002

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज शुक्रवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…

 

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७३,५१० असून मागील ट्रेडमध्ये ७३,१०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९३,८८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९३,५५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

 

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
मुंबई :- २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६७,२६५ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,३८० प्रति १० ग्रॅम आहे. पुणे :- प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,२६५ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,३८० रुपये आहे. नागपूर :- प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,२६५ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,३८० रुपये इतका आहे. नाशिक :- प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,२६५ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,३८० रुपये आहे.
(वरील सोन्याच्या अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

 

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here