सोन्याच्या दरात घसरण, चांदीच्या भावात झपाट्याने वाढ; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर

0
710

सराफा बाजारात आज सोनं स्वस्त झालं असून चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८९ रुपयांनी स्वस्त झालाय. तर चांदीच्या दरात ८०१ रुपयांची वाढ झालीये. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीशिवाय ९५,३८२ रुपयांवर खुला झाला. तर चांदी आता ९७,७१० रुपयांवर पोहोचली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.

 

आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनेही आज ८९ रुपयांनी स्वस्त झालं आणि ९५,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. त्याच वेळी, दुपारच्या सुमारास २२ कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत ८१ रुपयांनी घसरली आणि ८७,३७० रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडली. १८ कॅरेट सोन्याची किंमतही ६६ रुपयांनी स्वस्त झाली आहे आणि ती प्रति १० ग्रॅम ७१५३७ रुपयांवर आली आहे. तर, १४ कॅरेट सोन्याची किंमत ५३ रुपयांनी घसरून ५५७९८ रुपयांवर आली आहे.

 

आज, ३% जीएसटीसह, सोनं प्रति १० ग्रॅम ९८,२४३ रुपये आणि चांदी प्रति किलो १,००,६४१ रुपये दराने विकली जात आहे. सराफा बाजारात सोनं त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून ३७१८ रुपयांनी स्वस्त आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याचा दर ९९,१०० रुपये प्रति १० ग्रॅम या आजवरच्या उच्चांकी स्तरावर होता.

 

या वर्षी सोनं सुमारे १९,६४२ रुपयांनी आणि चांदी ११६९३ रुपयांनी महाग झाली आहे. ३१ डिसेंबर २४ रोजी सोनं ७६,०४५ रुपये प्रति १० आणि चांदी ८५,६८० रुपये प्रति किलोनं उघडली. या दिवशी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं. चांदी देखील ८६,०१७ रुपये प्रति किलोवर बंद झाली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here