
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई : गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या दरात आज काहीसा दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळाले. लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत होती. मात्र, बुधवारी भारतीय सराफा बाजारात २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली असून, ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले आहे.
बाजारातील आजचे दर (प्रति १० ग्रॅम):
२४ कॅरेट सोने: ₹९७,२३०
२२ कॅरेट सोने: ₹८९,१२८
चांदी (१ किलो): ₹१,०५,३९०
चांदी (१० ग्रॅम): ₹१,०५४
या किंमती उत्पादन शुल्क, राज्य कर व दागिन्यांवरील मेकिंग चार्जनुसार वेगवेगळ्या शहरांत थोड्याफार फरकाने बदलू शकतात.
प्रमुख शहरांतील दर (प्रति १० ग्रॅम):
शहर २२ कॅरेट २४ कॅरेट
मुंबई ₹८८,९६३ ₹९७,०५०
पुणे ₹८८,९६३ ₹९७,०५०
नागपूर ₹८८,९६३ ₹९७,०५०
नाशिक ₹८८,९६३ ₹९७,०५०
२२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्यात फरक काय?
२४ कॅरेट सोने सुमारे ९९.९% शुद्ध असते, पण ते खूप मऊ असल्याने त्यापासून दागिने तयार करणे कठीण असते. त्यामुळे सर्रासपणे २२ कॅरेटचे सोने वापरले जाते. २२ कॅरेट सोन्यात अंदाजे ९१% सोनं आणि उर्वरित ९% इतर धातू (तांबे, चांदी, जस्त) यांचे मिश्रण असते, जे दागिन्यांना मजबुती देतात.