
माणदेश एक्सप्रेस न्यूज :-
घरात उंदीर झाले की त्रास सुरू होतोच! हे उंदीर केवळ अन्नाची नासधूस करत नाहीत, तर कपडे, वायरिंग, आणि घरातील इतर वस्तूंनाही नुकसान पोहोचवतात. अनेक वेळा औषधे किंवा सापळे वापरूनही या उंदरांपासून सुटका मिळत नाही. मात्र काही सोप्पे आणि खर्चविरहित घरगुती उपाय या समस्येवर रामबाण ठरू शकतात.
लसणाचा वापर करा
उंदरांना लसणाचा वास सहन होत नाही. त्यामुळे घरात जिथे उंदरांचा वावर अधिक आहे, तिथे लसणाचे पाणी शिंपडावे किंवा लसणाचे तुकडे ठेवावेत. काहीच वेळात उंदीर पळून जातील.
कापूर आणि लवंगही प्रभावी
कापूर आणि लवंग यांचा तीव्र गंध उंदरांना नकोसा वाटतो. यामुळे यांचा वापर करून उंदरांना त्या भागांपासून दूर ठेवता येते. दररोज नव्याने हे ठेवणे अधिक परिणामकारक ठरते.
बेकिंग सोडा पोटात गेल्यावर होतो गोंधळ
पिठात किंवा साखरेत बेकिंग सोडा मिसळून तयार केलेले मिश्रण उंदरांना खायला दिल्यास त्यांचे पचन बिघडते आणि ते घर सोडून पळून जातात. हा उपाय करताना लहान मुलांपासून हे मिश्रण दूर ठेवणे गरजेचे आहे.
तंबाखूचा वास उंदरांना सहन होत नाही
बेसण, तूप आणि तंबाखू यांचे मिश्रण करून त्याचे छोटे छोटे गोळे करून उंदरांच्या जागी ठेवावेत. हा वास सहन न झाल्याने उंदीर तेथून निघून जातात.
सावधगिरी बाळगा
हे उपाय करताना घरात लहान मुले किंवा पाळीव प्राणी असतील तर विशेष काळजी घ्यावी. नैसर्गिक उपाय जरी असले तरी योग्य काळजी घेतल्यासच त्याचा फायदा होतो.