
गणेश सवाखंडे : आटपाडीतील देशमुख महाविद्यालयात शिबीर संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी शासनाच्या जात पडताळणी शिबिराचा लाभ घेऊन वेळेत जात पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन बार्टी चे जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी केले.समता पंधरवडा निमित्त श्रीमंत बाळासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास व्हीसीद्वारे सांगली जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी प्रतिभा इंगळे, सहाय्यक संशोधन अधिकारी ओंकार कुर्ले, प्राचार्य डॉ. शिवाजी भोसले, विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.
सांगली जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी प्रतिभा इंगळे यांनी व्हीसीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले.यावेळी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सहाय्यक संशोधन अधिकारी ओंकार कुर्ले यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी लागणारे कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज कसा करावा याबाबत सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या अडचणी व शंका यांचे निरसन केले.
प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी भोसले यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी करणे विद्यार्थ्यांकरिता किती महत्त्वाचे आहे याबाबत माहिती देवून शैक्षणिक दृष्ट्या व पुढील शिक्षणाकरिता जात प्रमाणपत्र काढून आपले शैक्षणिक नुकसान टाळावे असे सांगितले.सूत्रसंचालन पांडुरंग नाईकनवरे यांनी केले. आभार प्रा. प्रवीण पाटील यांनी मानले.या कार्यक्रमासाठी सांगली जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी प्रतिभा इंगळे, उपायुक्त तथा सदस्य नागनाथ चौगुले, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांचे मार्गदर्शन लाभले.