राधिका-अनंतच्या लग्नात जिनिलियाचा मराठमोळा लूक, नेटकरी म्हणाले….

0
171

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचं धुमधडाक्यात लग्न पार पडलं. या लग्नाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या लग्नाला उपस्थित होते. अभिनेत्री जिनिलिया देशमुखने दखील या लग्नाला हजेरी लावली.

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाला अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी हजेरी लावली. यावेळी जिनिलियाने पारंपरिक मराठमोळा लूक केला होता.

नववारी साडी आणि त्याला साजेसे दागिने जिनिलियाने परिधान केले होते. नववारी साडीला साजेशी चंद्रकोर लावली जिनिलियाने होती. तर नथही जिनिलियाने परिधान केली होती. तिचा हा लूक राधिका- अनंतच्या लग्नासह सोशल मीडियावरही चर्चेत आहे.

संस्कार हा असा दागिना आहे. जो वेगळा परिधान करावा लागत नाही, पण दिसतो, या दिग्दर्शक प्राजक्त देशमुखने लिहिलेल्या ओळीचं कॅप्शन देत जिनिलियाने हे खास फोटो शेअर केलेत.

ट्रेंडने भरलेल्या या जगात मला क्लासिक राहायचे आहे…, असंही जिनिलियाने म्हटलं आहे. तिच्या या लूकला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. याला म्हणतात संस्कार, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर चंद्र कोर म्हणावी की साक्षात चंद्र नभीचा…, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे.