
Women Dance Performance Ganpati : गणेशोत्सव म्हटलं की भक्तिभाव, आरत्या, ढोल-ताशांचा गजर, मंडपांची सजावट आणि भक्तांच्या हृदयातली अवर्णनीय श्रद्धा—हे सगळं वातावरण अंगावर रोमांच आणणारं असतं. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात सोशल मीडियावर भक्तिभावाने भारावलेले अनेक फोटो-व्हिडीओ पाहायला मिळतात. पण, या वर्षी एक असा भन्नाट डान्स व्हिडीओ समोर आला आहे, ज्याने अक्षरशः इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
एका मोठ्या हॉलमध्ये रंगीबेरंगी पोशाख घातलेल्या तरुणींच्या ग्रुपने गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी केलेला डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. गाणं सुरू होताच त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, पावलांमध्ये असलेली लय आणि संपूर्ण जोशपूर्ण परफॉर्मन्स पाहून प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः शहारे येतात.
हा डान्स केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता भक्ती, श्रद्धा आणि भारतीय संस्कृतीचं अप्रतिम दर्शन घडवतो. प्रत्येक स्टेप इतकी ताकदीची आणि नेमकी की प्रेक्षक डोळे झाकायलाही विसरतात. पाहताना असं वाटतं की, या परफॉर्मन्ससाठी या तरुणींनी प्रचंड मेहनत घेतली आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड होताच काही तासांत हजारोंच्या संख्येनं लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स मिळाले.
अनेकांनी लिहिलं –
“हा डान्स पाहून अंगावर काटा आला.”
“गणपती बाप्पांच्या स्वागताचा आनंद याहून वेगळा साजरा होऊच शकत नाही.”
“भारतीय संस्कृती आणि परंपरांचा झगमगता आरसा म्हणजे हा डान्स.”
काहींनी या व्हिडीओला “स्पेशल” म्हटलं आहे, तर अनेकांनी तो वारंवार पाहिल्याचं सांगितलं आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून भक्ती, श्रद्धा आणि कलाविष्कार यांचा अद्भुत संगम आहे. या तरुणींच्या ग्रुपने सादर केलेला हा डान्स म्हणजे बाप्पावरील श्रद्धेचं जिवंत रूप आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, भावनांमधली प्रामाणिकता आणि नृत्यातून व्यक्त झालेली ऊर्जा यामुळे हा व्हिडीओ सर्वांच्या हृदयाला भिडतो.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ नवीन नसून काही वर्षांपूर्वी रेकॉर्ड करण्यात आला होता. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Just WOW!!!!
Goosebumps 🥹🥹 pic.twitter.com/wohXiHOjud
— Prernaa (@theprernaa) August 24, 2025