गळवेवाडी “मॉडेलस्कूल” बांधकाम न्यायप्रविष्ठ बाब : पोलिसांनी शाळेच्या बांधकामास बंदोबस्त देवू नये : विजय गोडसे

0
4
शाळेचा प्रतिकात्मक फोटो
शाळेचा प्रतिकात्मक फोटो

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथे सुरु असलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे “मॉडेलस्कूल” बांधकाम ही न्यायप्रविष्ठ बाब आहे. सदर प्रकरणी अद्याप कोणताही न्यायालयाने निर्णय दिला नाही. त्यामुळे सदर शाळेच्या बांधकामास आटपाडी पोलिसांनी बंदोबस्त देवू अशी मागणी विजय गोडसे यांनी केली आहे.

यावेळी बोलताना विजय गोडसे म्हणाले, आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथे जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक शाळेचे “मॉडेलस्कूल” अंतर्गत बांधकाम सुरु आहे. ग्रामपंचायतने “मॉडेलस्कूल” चे बांधकाम करताना मी खरेदी केलेल्या मिळकत क्रमांक ८१ मध्ये शाळेचे बांधक करीत आहेत. याबाबत विटा येथील न्यायालयात सदर बाबत दावा सुरु आहे. न्यायालयाने गळवेवाडी ग्रामपंचायतीस मिळकत क्रमांक ५३ व ५६ व ७३३ मध्ये बांधकाम करण्याची परवानगी दिली आहे. मिळकत क्रमांक ८० व ८१ ची हद्द न्यायालयाने निश्चित करून दिली नाही.

“मॉडेलस्कूल” चे बांधकाम करण्याअगोदर मिळकत क्रमांक ८० व ८१ ची मोजणी होणे आवश्यक आहे. तसेच न्यायालयाने याबाबत उपअधीक्षक भूमी अभिलेख यांची कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे गळवेवाडी ग्रामपंचायतीने मिळकत क्रमांक ८०, ८१ व ७३३ या तीनही मिळकतींची जागेची हद्द निश्चित करूण बांधकाम करणे अपेक्षित आहे. त्यामुळे आटपाडी पोलिसांनी सदर “मॉडेलस्कूल” बांधकामास पोलीस बंदोबस्त देवू नये असे अशी मागणी विजय गोडसे यांनी केली असून तसा जबाब हि त्यांनी पोलिसांना लिहून दिला आहे.