चार महिन्यांत ६० रुपयांवरून थेट २५२ रुपयांवर – “या” शेअरने गुंतवणूकदारांना दिलं जबरदस्त रिटर्न

0
85

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई – शेअर बाजारातील एका माफक किंमतीच्या शेअरने गुंतवणूकदारांना अवाक् केलं आहे. NACL Industries Ltd या कंपनीच्या शेअरने अवघ्या चार महिन्यांत ३०० टक्क्यांहून अधिक परतावा (returns) दिला आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये केवळ ₹६० च्या आसपास ट्रेड करणारा हा शेअर सध्या ₹२५२ च्या पातळीवर पोहोचला आहे.

 

कृषी-रसायन क्षेत्रातील (Agrochemical Sector) NACL ही देशातील नामांकित कंपनी असून, पीक संरक्षणासाठी लागणाऱ्या कीटकनाशकांपासून ते औषधनिर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांपर्यंत अनेक उत्पादनांच्या निर्मितीत ती कार्यरत आहे. शेवटच्या काही तिमाहीत कंपनीने नफ्यात लक्षणीय वाढ नोंदवली आहे, ज्याचा परिणाम थेट शेअरच्या किमतीवर झाला आहे.

 

गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
गेल्या काही आठवड्यांपासून या शेअरमध्ये मजबूत खरेदीचा ओघ पाहायला मिळत आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, कंपनीच्या आर्थिक कामगिरीत सातत्य, कर्जमुक्त मॉडेल आणि निर्यातीतील वाढती मागणी यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.

 

भविष्यातील दिशा काय?
विश्लेषकांच्या अंदाजानुसार, जर कंपनीचा वाढीचा कल असाच राहिला, तर NACL इंडस्ट्रीज हा शेअर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकतो. मात्र, अल्पकालीन गुंतवणूकदारांनी लाभ पदरात पाडून बाहेर पडण्याचाही विचार करावा, असंही मत व्यक्त केलं जातंय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here