
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी / प्रतिनिधी : खानापुर आटपाडी विसापुर विधानसभा क्षेत्रातील 6 हजार घरकुले बांधण्यासाठी शासन धोरणानुसार ५ ब्रास मोफत वाळू मिळावी अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी केली. नागपुर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार बाबर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले.
आमदार सुहासभैय्या बाबर म्हणाले, खानापुर आटपाडी विसापुर विधानसभा मतदारसंघामध्ये शासनाच्या वतीने 6 हजार पेक्षा जास्त घरकुलांना मान्यता मिळाली आहे. या घरकुलांचे कामही सुरू आहे. शासनाच्या माध्यमातून या घरकुलांच्या बांधकामांला 5 ब्रास मोफत वाळू देण्याचे धोरण जाहीर झाले होते. परंतु आमच्या खानापुर तालुक्यामध्ये कोणताही वाळूचा डेपो आतापर्यंत देण्यात आलेला नाही. आणि आटपाडी तालुक्यामध्ये जे वाळूचे डेपो देण्यात आले आहेत त्यांना स्थानिक लोकांचा खुप मोठा विरोध आहे. अशा परस्थितीत या घरकुलांसाठी वाळू मिळाली नाही तर ती कामे अपुर्ण राहण्याची शक्यता आहे.
या सर्व बाबींचा विचार करून महसूल मंत्र्यांनी अन्य भागातून किंवा कृत्रिम वाळू तयार करणाऱ्या सर्व नव्या युनिट्सना खुप साऱ्या सवलती जाहीर केल्या आहेत. ज्या ठिकाणी वाळूची उपलब्धता होत नाही. आणि त्या ठिकाणी अन्य भागातून किंवा कृत्रिम वाळू तयार करणाऱ्या क्रशरला आपण परवानगी देत असू किंवा सवलत देत असाल आणि ज्या ठिकाणी जर नदीची वाळू मिळत नाही अशा ठिकाणी असणाऱ्या कृत्रिम वाळू तयार करणाऱ्या क्रशरनी घरकुलांना 5 ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचे आदेश व्हावेत आणि ते शक्य नसेल तर ज्या ठिकाणी डेपो आहेत अशा ठिकाणची वाळू घरकुलांसाठी मिळावी आणि ही घरकुले पुर्ण व्हावीत अशी मागणीही आमदार बाबर यांनी केली.


