अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेदरम्यान गोळीबार

0
389

अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेदरम्यान गोळीबार झाला. ही घटना पेनसिल्व्हेनियामध्ये रॅली घेत असताना घडली. रॅलीत असताना एकाने गोळीबार केला. या गोळीबारातून सुदैवातून डोनाल्ड ट्रम्प बचावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांना मंचावरून तात्काळ बाहेर काढण्यात आले. या गोळीबारात एक जण जखमी झाले आहे. रॅली पेनसिल्व्हेनियाच्या ग्रेटर पिट्स बर्ग भागातील बटरल काऊंटीमध्ये आयोजित करण्यात आले होते. डिस्ट्र्क्ट अॅटर्नीने सांगितले की, गोळीबारात ट्रम्प यांच्या कानाला थोडी दुखापत झाली असून ते बरे होईल. यूएस सीक्रेट सर्व्हिसने म्हटले आहे की, ते सुरक्षित आहे.

त्यांना उपचारासाठी स्थानिक वैद्यकिय केंद्रात नेण्यात आले. गोळीबार करणाऱ्या शूटरला त्याच क्षणी गोळी लागली. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोळीबार रॅलीच्या ठिकाणाच्या बाहेर एका इमारतीत लपला होता. या घटनेनंतर पोलिसांनी रॅलीचे मैदान तात्काळ रिकामे केले आणि गोळीबार करणाऱ्याचा शोध घेतला. गोळीबार करणाऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या रॅलीत आणखी एक जण जखमी झाला आहे.

हा हत्येचा प्रयत्न होता की नाही हे बिडेन यांनी सांगितले नाही. संपूर्ण माहिती येईपर्यंत वाट पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुप्त सेवा संपर्क प्रमुख अँथनी गुग्लिएल्मी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की.

पहा व्हिडीओ: