माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातून माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी खानापूर मतदार संघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. राजेंद्रआण्णा देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सध्यातरी मतदार संघामध्ये चौरंगी लढत होणार आहे.
खानापूर मतदार संघ हा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटला आहे. पक्षाच्या वतीने येथून विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
विट्याचे नगराध्यक्ष व अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले वैभव पाटील यांनी निवडणूक लढविण्यासाठी अजित पवार गटाला रामराम करत, शरदचंद्र पवार गटात प्रवेश करत उमेदवारीवर दावेदारी केली होती. परंतु भाजपचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी भाजपला सोडचिट्ठी देत उमेदवारीचा शब्द घेत, राष्ट्र्वादीच्या शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. वैभव पाटील व राजेंद्रआण्णा देशमुख हे दोन्ही लढण्यास ठाम असल्याने उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झाला असला तरी उमेदवारीची माळ वैभव पाटील यांच्या गळ्यात पडली.
वैभव पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने राजेंद्रआण्णा देशमुख यांनी आपल्या गटाची बैठक आटपाडी येथे आयोजित केली होती. यावेळी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा असे आवाहन यावेळी राजेंद्रआण्णा यांना समर्थकांकडून करण्यात आले होते. त्यामुळे आज राजेंद्रआण्णा देशमुख यांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी विट्याचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, जेष्ठ नेते रवींद्र देशमुख, युवा नेते शंकर मोहिते, यांच्यासह आटपाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.