खानापूरमध्ये आ. सुहास बाबर यांच्या हस्ते वन विभाग निवासस्थानांचा शुभारंभ

0
126

माणदेश एक्सप्रेस न्यूज

खानापूर : खानापूर येथील वन विभागाच्या आवारात आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते वन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या विविध इमारतींचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला.

या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग डोंगरे, नगराध्यक्ष जयश्री मंडले, उपनगराध्यक्ष मेघा हिंगमिरे, माजी नगराध्यक्ष सुमन पाटील, बांधकाम सभापती सुनील मंडले, पाणीपुरवठा सभापती चंदना भगत, वनपाल राजेंद्र पाटील आणि वनपरिक्षेत्र अधिकारी विलास पवळे उपस्थित होते.

सांगली वन विभागाअंतर्गत कोल्हापूर वनपरिक्षेत्रातील या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय आहे. राज्य कॅम्प योजनेअंतर्गत येथील नवीन इमारतींचे बांधकाम होणार असून, वनपाल खानापूर, वनरक्षक खानापूर आणि वनरक्षक बलवडी यांचे निवासस्थान येथे उभारले जाणार आहे. याचा थेट लाभ खानापूर परिसरातील वन व्यवस्थापन व अधिकारीवर्गाला होणार आहे.

“वन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचे भूमिपूजन आज पार पडले. या कामामुळे अधिकाऱ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध होणार असून, त्यामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल आणि वनसंवर्धनाच्या योजनांना अधिक गती मिळेल,” असे आमदार सुहास बाबर यांनी सांगितले. भूमिपूजन प्रसंगी लालासाहेब पाटील, प्रकाश जोशी, बबनराव माने, शिवसेनेचे दादा भगत, हर्ष माने, बलराज माने, बाळासाहेब धेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन वन विभागाचे फिरोज शिकलगार, शितल मांगले, प्रतिभा मंडले, शशिकला पाटील, दगडू क्षीरसागर आणि ए.के. खापरकर यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here