सांगलीत पाटबंधारे विभागात पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

0
69

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर सांगली पाटबंधारे विभाग, सांगली अंतर्गत मध्यवर्ती सांगली पूरनियंत्रण कक्षाचे उद्घाटन कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अभियंता दयानंद बगली, योगिता थोरात, सहाय्यक अभियंता श्वेता दबडे-पाटील व सांगली पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी पूरनियंत्रण कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून क्षेत्रीय स्तरावरून पाणीपातळी अहवाल देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावर्षीही पूरनियंत्रणाचे कामकाज उत्तमरित्या करण्यात येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

 

पूरनियंत्रण कक्ष दि. 1 जून ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये अखंडित कार्यरत ठेवण्यात येत असून अधिक माहितीसाठी पूरनियंत्रण कक्षामधील दूरध्वनी क्र. 0233-2301820 व 0233-2302925 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

पूरनियंत्रण कक्षाचे कामकाज हे प्रतिवर्षी 1 जूनपासून सुरू करण्यात येते. तथापि या वर्षी माहे मे मध्ये सुरू झालेल्या पावसामुळे दि. 26 मे 2025 पासूनच हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षात 126 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 24 X 7 हा कक्ष कार्यान्वित राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here