![चित्रपट](https://mandeshexpress.com/wp-content/uploads/2025/01/चित्रपट.png)
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ सिनेमा काल २४ जानेवारीला रिलीज झाला. मराठी कलाकारांची फौज असलेला हा मल्टिस्टार सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. ‘फसक्लास दाभाडे’ सिनेमाची गाणीही सध्या ट्रेंडिंगवर आहेत. ‘फसक्लास दाभाडे’ सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी थिएटर हाउसफुल्ल केलेली दिसत आहेत. ‘फसक्लास दाभाडे’च्या पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आला.
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’चा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. या रिपोर्टमध्ये ‘फसक्लास दाभाडे’ची पहिल्या दिवसाची कमाई पाहायला मिळतेय. ‘फसक्लास दाभाडे’ सिनेमाने भारतात जवळपास २८ लाखांचा व्यवसाय केलाय. तर जगभरात सिनेमाने ३१ लाख कमावले आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी ‘फसक्लास दाभाडे’ सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाल्याचं दिसतंय.
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ सिनेमात सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरीश दुधाडे, उषा नाडकर्णी, राजन भिसे या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.