बांग्लादेशात संतप्त जमावाच्या मारहाणीमुळे प्रसिद्ध बांग्लादेशी अभिनेता शांतो खान आणि त्याच्या वडीलांची हत्या

0
280

बांग्लादेशात या आठवड्यात झालेल्या हिंसक घटनांमध्ये चित्रपट निर्माता सलीम खान आणि त्यांचा मुलगा शांतो खान यांच्या दुःखद मृत्यूने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. संतप्त जमावाने सलीम खान आणि त्यांचा मुलगा शांतो खान यांना बेदम मारहाण केली. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, सलीम आणि शांतो खान त्यांच्या गावातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांना बलिया युनियनमधील फोर्काबाद मार्केटमध्ये संतप्त जमावाचा सामना करावा लागला. जमावापासून वाचण्यासाठी त्यांनी आपल्या पिस्तुलातून गोळी झाडली, परंतु जवळच्या जमावाने त्यांना घेरले आणि बेदम मारहाण केली आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला.

सलीम खान : एक आघाडीचा चित्रपट निर्माता

सलीम खान हे लक्ष्मीपूर मॉडेल युनियन परिषदेचे (यूपी) अध्यक्ष होते. ते शापला मीडियाचे मालक आणि दिग्दर्शक होते, ज्यानी शेख यांच्यावर आधारित ‘शहेनशाह’ आणि ‘बिद्रोही’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

शांतो खान : उगवता तारा

‘टुंगी परर मियाँ भाई’ या चित्रपटात शेख मुजीबुर रहमानच्या बालपण आणि तरुणपणाची भूमिका साकारणारे शांतो खान सलीम खानच्या बॅनरखालील अनेक चित्रपटांमध्ये दिसले.

शंका आणि आरोप

स्थानिक लोकांनी सलीम खान यांच्यावर पद्मा-मेघना नदीतून रेती काढल्याचा आरोप केला होता, त्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले होते आणि अलीकडेच सलीम खान यांच्यावर भ्रष्टाचार आयोगात खटला सुरू होता. ज्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

चित्रपटसृष्टीतील अनेकांची प्रतिक्रिया :

शांतो खान यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बांग्लादेशात घडणाऱ्या घटनांवर बंगाली चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी चिंता व्यक्त केली आहे. बांग्लादेशात घडणाऱ्या घटनांवर बंगाली चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी चिंता व्यक्त केली आहे.

बांग्लादेशात गोंधळ

राजकीय अस्थिरता आणि हिंसक निदर्शने यामुळे देशातील परिस्थिती गंभीर आहे, या हिंसाचारात पोलिस गोळीबार, जमावाचा हिंसाचार आणि विद्यार्थ्यांमधील संघर्षात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बांग्लादेशातील राजकीय संकट आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे. आता देशाची कमान लष्कराच्या हातात आहे जी अंतरिम सरकार बनवण्यात व्यस्त आहे.